पोलीस असल्याची बतावणी करून तिघांना लुटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2019 01:26 AM2019-02-14T01:26:21+5:302019-02-14T01:26:47+5:30
शिवाजी पुतळा आणि अलाहाबाद बँक तसेच मामा चौकात पोलीस असल्याची बतावणी करून लुटल्याचे प्रकार घडले
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : शहरातील शिवाजी पुतळा आणि अलाहाबाद बँक तसेच मामा चौकात पोलीस असल्याची बतावणी करून लुटल्याचे प्रकार घडले आहेत. परंतु, या प्रकरणी रात्री नऊ वाजेपर्यंत गुन्हा दाखल झाला नव्हता.
फटाका व्यापारी शंकरसिंह गौड हे टेलिफोन बिल भरण्यासाठी जात असताना शिवाजी पुतळ्याजवळ दुपारी त्यांना दोन युवकांनी अडवून पोलीस असल्याची बतावणी केली. यावेळी त्यांच्याकडून तीन तोळे सोन्याचे लॉकेट आणि अंगठी लंपास केली. या प्रकरणी गौड यांच्या तक्रारीवरून सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर अन्य दोन प्रकरणांची नोंद आमच्याकडे नसल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, बुधवारी अलाहाबाद बँकेजवळ एका महिलेचे मंगळसूत्र पळविले तर मामा चौकात शेतकऱ्याला धाक दाखवून लुटल्याची घटना घडली.