लोकमत न्यूज नेटवर्कजालना : नवीन मोंढा भागात दररोज हजारो शेतकरी, व्यापारी हे आपला माल विक्रीसाठी आणतात. त्यामुळे येथे दररोज लाखोंचे व्यवहार होतात. असे असले तरी या परिसरात स्वतंत्र पोलीस चौकी नाही. त्यामुळे चोऱ्या, लूटीचे प्रकार वाढले आहेत. त्यामुळे या भागात तातडीने स्वतंत्र पोलीस चौकी उभारण्याची मागणी मंगळवारी व्यापारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी केली. तसेच बांधकाम व्यावसायिक गौतम मुनोत यांच्या हल्ला प्रकरणातील आरोपींच्या मुसक्या आवळल्या प्रकरणी देखील व्यापा-यांनी पोलीस अधीक्षक एस.चैतन्य आणि स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांचे स्वागत केले.जालना शहरात यापूर्वीही चार वर्षापूर्वी नवीन मोंढा भागातून तीन ते चार लाख रूपयांची रोख रक्कम अशाच पध्दतीने लुटली होती. तशीच घटना सोमवारी पुन्हा त्याच नवीन मोंढा परिसरातील हनुमान मंदिर परिसरात घडली आहे. यामुळे व्यापा-यांमध्ये खळबळ उडाली आहे.यावेळी पोलीस अधीक्षक एस.चैतन्य यांनी व्यापा-यांशी एकूणच सर्व मुद्यांवर चर्चा केली. त्यावेळी पोलिसांकडून गुन्हेगारांचा शोध घेऊन त्यांना जेरबंद केले जात असल्याबद्दल त्यांनी यंत्रणेचे स्वागत केले.यावेळी गौतम मुनोत यांच्या घरावर हल्ला करून त्यांन जिवे मारण्याची सुपारी देणाºया संशयित आरोपी राजेश नहारकडून वदवून घेतल्याने व्यापा-यांना मोठा दिलासा मिळाल्याचे तवरावाला यांनी सांगितले. यावेळी भरत गादिया यांनीही पोलिसांच्या कामगिरीबद्दल समाधान व्यक्त केले.
नवीन मोंढा परिसरात पोलीस चौकी उभारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2019 1:01 AM