जालना : शहरात एस. डी. एस. ब्रोकींग अँड ट्रेडींग प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या नावाखाली चालणाऱ्या ८ जुगार लॉटरी सेंटरवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एकाच वेळी धाड टाकली. यात पोलिसांनी ८ जणांना ताब्यात घेतले.
अनिल सुखदेव जाधव (४२ रा. गांधी चमन), मनोज बालचंद परीवाले (३५, रा. अग्रेसेन नगर), संतोष कचरुलाल परीवाले (संग्रामनगर), इम्रानखान सरवर खान(२५, रा. रेल्वेस्टेशन), भास्कर दामोधर पाईकराव (४८ रा. संग्राम नगर), गजानन कारभारी कावळे (२२, रा. बुटेगाव ता. जालना), देविदास दिनानाथ चव्हाण (२७ रा. काद्राबाद), इब्राहीम शेख मोईनोद्दीन (२७ रा. इंदिरा नगर) अशी आरोपींची नावे आहेत.
शहरात बऱ्याच ठिकाणी एस. डी. एस. ब्रोकींग अँड ट्रेडींग प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या नावाखाली परवाना नसतांना जुगार अड्ड्े सुरु असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांना मिळाली . या माहितीवरुन त्यांनी शहरातील काही आॅनलाईन लॉटरी सेंटरवर बनावट ग्राहक पाठवून खात्री केली. त्यानंतर त्यांनी वेगवेगळी पथके तयार करुन शहरातील ८ लॉटरी सेंटरवर एकाच वेळी धाडसत्र टाकले. यावेळी ८ लॉटरी सेंटरची तपासणी करुन ८ जणांना ताब्यात घेण्यात आले. तसेच आरोपींच्या ताब्यातून जुगार खेळण्यासाठी लागणारे साहित्य, वेगवेगळ््या कंपन्याचे संगनक संच, नगदी रक्कम, मोबाईल असा एकूण ४ लाख ५८ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि. राजेंद्रसिंह गौर, पोउपनि. जयसिंग परदेशी, सपोउपनि. कमलाकर अंभोरे, विश्वनाथ भिसे, शेख रज्जाक, संतोष सावंत, शांतीलाल दाभाडे, हरीष राठोड, कैलास कुरेवाड, सुरेश गीते, फुलचंद हजारे, गोकुळसिंग कायटे, सॅम्युअल कांबळे, रामेश्वर बघाटे, तुकाराम राठोड, समाधान तेलंग्रे, विनोद गडदे, प्रशांत देशमुख, कृष्णा तंगे, रंजित वैराळ, फुलसिंग गुसिंगे, सचिन चौधरी, सदाशिव राठोड, किशोर जाधव, रवि जाधव, हिरामन फलटनकर, सोमनाथ उबाळे, राहुल काकरवाल, विष्णु कोरडे, किरण मोरे, योगेश जगताप, मदन बहुरे, वैभव खोकले, विलास चेके, अंबादास साबळे, मंदा बनसोडे, ज्योती खरात, पुनम भट, शमशाद पठाण, सारीका गोडबोले, मंदा नाटकर, संजय राऊत यांनी केली.