पूर्णा नदीपात्रात अवैध वाळू वाहतूक करणारे पाच ट्रॅक्टर पोलिसांच्या ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2020 12:22 AM2020-03-16T00:22:46+5:302020-03-16T00:23:30+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क भोकरदन : येथील उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकाने रविवारी १५ मार्च रोजी दुपारी नांजा व केदारखेडा शिवारातील ...
लोकमत न्यूज नेटवर्क
भोकरदन : येथील उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकाने रविवारी १५ मार्च रोजी दुपारी नांजा व केदारखेडा शिवारातील पूर्णा नदीपात्रातून अवैध वाळू उत्खनन, वाहतूक करणा-या पाच वाहनांवर कारवाई केली. या वेळी एकूण २७ लाख ५३ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी केदारखेडा येथे एक ट्रॅक्टर वाळूसह जप्त करून केदारनाथ जाधव यांचेवर कारवाई केली. दुपारी नांजा येथे वाळू उत्खनन, वाहतूक करणारे ४ ट्रॅक्टर मिळून आले. जप्त केलेली वाहने ठाण्याच्या आवारात लावली आहेत. अनिल मोरे (नांजा) व इतर फरार आरोपींवर ५ वेगवेगळे गुन्हे नोंद केले आहेत. या कारवाईत २७ लक्ष ५३ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई पोलीस अधीक्षक अधीक्षक एस. चैतन्य, अप्पर पोलीस अधीक्षक समाधान पवार, डीवायएसपी सुनील जायभाये यांचे मार्गदर्शनाखाली पोनि दशरथ चौधरी, सपोनि बी.बी. वडदे व पोलीस कर्मचाऱ्यांनी केली.
पोलीस, महसूलच्या कारवाईत फरक !
पोलिसांनी वाहने पकडल्यानंतर गुन्हा दाखल करून वाळू जप्त केली जाते. तर महसूलने कारवाई केल्यानंतर लाखो रूपयांचा दंड आकारला जातो. त्यामुळे अनेक वाळू माफिया पोलिसांची कारवाई परवडते अशा आविर्भावात राहत आहेत. त्यामुळे जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षकांनी याकडे लक्ष देऊन पोलिसांनी केलेल्या कारवाईनंतरही नियमानुसार मोठा दंड आकारण्याची गरज आहे.
रविवारी सुटी असल्याने वाळू तस्करांकडून बिनधास्तपणे वाळूचे उत्खनन, वाहतूक सुरू होते. मात्र, माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकाºयांचे पथक व भोकरदन पोलिसांनी धडक कारवाई केली. कारवाईनंतर वाहने सोडा आणि वाहने सोडू नका म्हणून आलेल्या फोनमुळे मात्र, पोलीस कर्मचारी चांगलेच वैतागले होते.