पोलिसांची मॉक ड्रील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2018 12:45 AM2018-09-21T00:45:42+5:302018-09-21T00:46:36+5:30
गुरुवारी जालना पोलिसांच्या वतीने मामाचौक येथे मॉक ड्रील करण्यात आली.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : गणेशात्सवाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी जालना पोलिसांच्या वतीने मामाचौक येथे मॉक ड्रील करण्यात आली. यावेळी दंगा नियंत्रक पथक व पोलिसांनी दंग्यावर नियंत्रण आणण्याची विविध प्रात्यक्षिके दाखविली.
शहर पोलिसांच्या वतीने गुरुवारी शहरातील मामा चौक येथे अचानक पोलिसांच्या गाड्या आल्या. या गाड्यामधून एका मागे एक पोलीस अधिकारी उतरल्याने एकच खळबळ उडाली. त्यानंतर पोलिसांनी प्रात्यक्षिके दाखविणे सुरु केले. यावेळी दंग्यावर नियंत्रण आण्यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांनी प्रात्यक्षिके दाखविली. यावेळी अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार, उपविभागीय अधिकारी शिलवंत ढवळे यांच्यासह पोलीसांची उपस्थिती होती.
प्रात्यक्षिके दाखविताना अधिका-यांकडून अनेक चुका झाल्यामुळे अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांनी सर्व पोलीस अधिका-यांना धारेवर धरले. त्यानंतर अधिका-यांची चांगली परेड घेतली.