आपल्या यशात प्रीमिअर इन्स्टिट्यूटचा मोलाचा वाटा : उपाध्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 07:58 AM2021-02-05T07:58:20+5:302021-02-05T07:58:20+5:30

यावेळी अंकुशसरांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले की, माझ्या क्लासमधून आज अनेक विद्यार्थी घडले आहेत. कोणी डॉक्टर, इंजिनिअर झाले आहेत. ...

Premier Institute plays a vital role in your success: Upadhyay | आपल्या यशात प्रीमिअर इन्स्टिट्यूटचा मोलाचा वाटा : उपाध्याय

आपल्या यशात प्रीमिअर इन्स्टिट्यूटचा मोलाचा वाटा : उपाध्याय

Next

यावेळी अंकुशसरांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले की, माझ्या क्लासमधून आज अनेक विद्यार्थी घडले आहेत. कोणी डॉक्टर, इंजिनिअर झाले आहेत. अनेकजण स्पर्धा परीक्षा देऊन विविध उच्च पदांवर कार्यरत आहेत. परंतु सत्यकुमार उपाध्याय याने थेट यूपीएससी परीक्षेत देशात जालन्याचे नाव उंचावले आहे आणि तोदेखील आमच्याच प्रीमिअर इन्स्टिट्यूटचा विद्यार्थी असल्याने त्याचा मोठा सार्थ अभिमान आम्हाला असल्याचे ते म्हणाले. त्यांच्या या यशामुळे इतर विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळेल असा दावाही अंकुशसरांनी केला आहे. या सत्कार सोहळ्यात उपाध्याय यांनी आपल्या अनेक आठवणींना उजाळा दिला. कार्यक्रमास सत्यकुमार उपाध्याय यांचे आई, वडील उपस्थित होते.

चौकट

विज्ञान शाखेत मोठ्या संधी

आज विज्ञान शाखा ही अत्यंत महत्त्वाची शाखा मानली जाते. या शाखेत करिअर करताना तुम्हाला इंजिनिअर, डॉक्टर तर होताच येते; परंतु स्वत:चा उद्योगही सुरू करता येतो. त्यातच अंकुशसरांचे पोटतिडकीने काढलेल्या नोटस अत्यंत महत्त्वाच्या ठरतात. विद्यार्थ्यांनी जिद्द आणि चिकाटी ठेवून ध्येयाकडे वाटचाल केली पाहिजे. यूपीएससी परीक्षेत यश यावे म्हणून १८ ते २० तास अभ्यास करत होतो, असेही सत्यकुमार उपाध्याय यांनी नमूद केले.

Web Title: Premier Institute plays a vital role in your success: Upadhyay

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.