प्रशासनाकडून निवडणुकीची तयारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2019 01:14 AM2019-09-05T01:14:28+5:302019-09-05T01:14:59+5:30
विधानसभेच्या तोंडावर सर्व राजकीय पक्ष कामाला लागले असून, याप्रमाणेच निवडणूक यशस्वीपणे पार पडावी म्हणून जिल्हा प्रशासनही कामाला लागले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : विधानसभेच्या तोंडावर सर्व राजकीय पक्ष कामाला लागले असून, याप्रमाणेच निवडणूक यशस्वीपणे पार पडावी म्हणून जिल्हा प्रशासनही कामाला लागले आहे. याचाच एक भाग म्हणून जालना जिल्ह्यातील पाचही विधानसभा मतदार संघातील जवळपास एक हजार ६७८ मतदान केंद्रावर इव्हीएम आणि व्हीव्हीपॅटचे प्रात्यक्षिक मतदारांना दाखविण्यात येणार आहे.
यासाठी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन तालुका निहाय मतदान केंद्र निश्चित केले आहेत. जिल्ह्यतील पाचही मतदार संघात दोन हजार २१३ कंट्रोल युनिट ३ हजार १०७ बॅलेट युनिट आणि दोन हजार २८२ व्हीव्हीपॅट यंत्राची प्रथम स्तरीय तपासणी पूर्ण झाली आहे. मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार इव्हीएम, व्हीव्हीपॅट संदर्भात जनजागृती मोहीम राबविली जाणार आहे. या पथकात चार कर्मचारी आणि एक पोलिस कर्मचारी राहणार आहे.
जिल्ह्यातील पाचही मतदारसंघासत एक हजार ६७८ मतदान केंद्र आहेत.