२०० खाटांच्या मनोरूग्णालयाचा प्रस्ताव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2018 12:17 AM2018-09-20T00:17:38+5:302018-09-20T00:17:56+5:30
जालना येथे ५ एकर परिसरामध्ये मनोरूग्णालयाचा प्रस्ताव आरोग्य विभागाकडे पाठविण्यात आला आहे. २०० खाटांच्या या रूग्णालयासाठी अंदाजे २०० कोटींपेक्षा अधिक खर्च अपेक्षित आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जालना येथे ५ एकर परिसरामध्ये मनोरूग्णालयाचा प्रस्ताव आरोग्य विभागाकडे पाठविण्यात आला आहे. २०० खाटांच्या या रूग्णालयासाठी अंदाजे २०० कोटींपेक्षा अधिक खर्च अपेक्षित आहे.
जिल्हा सामान्य रूग्णालयाच्यावतीने त्यांना लागून असलेल्या पाच एकर परिसरामध्ये मनोरूग्णालय उभारणीचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. ही जमीन नुकतीच जिल्हा सामान्य रूग्णालयाकडे वर्ग करण्यात आली आहे. या रूग्णालयामध्ये जवळपास ४० पेक्षा अधीक तज्ज्ञ डॉक्टर आणि जवळपास शंभर जणांचा आणखी अधिकारी कर्मचारी वर्ग लागणार आहे. तसेच या अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी निवासस्थानांची गरज लक्षात घेऊन हा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.
या संदर्भात जिल्हा शल्यचिकित्सक मधुकर राठोड यांनी जिल्हाधिकाºयांसोबत चर्चा करून हा प्रस्ताव तयार केला असल्याचे त्यांनी लोकमतशी बोलताना सांगितले. हे रूग्णालय जालन्यात व्हावे म्हणून ब-याच वर्षांपासून पाठपुरावा केला जात होता. हा प्रस्ताव सद्यस्थितीत मंजुरीच्या प्रतीक्षेत असून प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यास लगेचच अन्य बाबींची पूर्तता करून रूग्णालयाचे काम सुरू करण्यात येऊ शकते असेही त्यांनी स्पष्ट केले.