जुन्या पेन्शनसाठी घंटानाद आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 8, 2018 12:55 AM2018-04-08T00:55:38+5:302018-04-08T00:55:38+5:30
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शनिवारी जुनी पेन्शन हक्क संघटनेच्यावतीने घंटानाद आंदोलन करण्यात आले. शासन सेवेतल्या २००५ नंतरच्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू व्हावी या प्रमुख मागणीचे निवेदन संघटनेच्या पदाधिका-यांनी निवासी उपजिल्हाधिकारी राजेश जोशी यांना दिले.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शनिवारी जुनी पेन्शन हक्क संघटनेच्यावतीने घंटानाद आंदोलन करण्यात आले. शासन सेवेतल्या २००५ नंतरच्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू व्हावी या प्रमुख मागणीचे निवेदन संघटनेच्या पदाधिका-यांनी निवासी उपजिल्हाधिकारी राजेश जोशी यांना दिले.
प्राथमिक शिक्षकांच्या वरिष्ठ वेतनश्रेणीबाबतच्या अन्यायकारक शासन निर्णय रद्द व्हावा या प्रमुख मागणीसाठी संघटनेचे जालना जिल्हाध्यक्ष ईश्वर गाडेकर, सरचिटणीस रामेश्वर पवार यांच्या नेतृत्त्वात करण्यात आलेल्या आंदोलनात शिक्षक, विविध विभागातील अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. आंदोलनात राज्य प्रसिद्धीप्रमुख संतोष देशपांडे, संतोष डोंगरखोस, कार्याध्यक्ष दीपक चव्हाण, सचिव राम सोळंके, अरुण राऊत, संजोग मोहरुत, उमेश जोशी, महेश चौधरी, पवन गडदे, चक्रधर बागल, भाऊसाहेब पाऊसे, संदीप उबाळे, माधव नागरे, योगेश गाडेकर, राम कदम, हनुमान मुंजाळ, विजय सदावर्ते, बद्री यादव, राजीव हजारे, बाजीराव गोरे, शरद शिंदे, गणेश तायडे, भगवान देठे, विठ्ठल सपकाळ, राहुल बांडे, नारायण राठोड, शिवराम इसनकर, महादेव खरात, अमोल वायाळ आदींनी सहभाग घेतला. आंदोलनास विविध कर्मचारी संघटनेच्या पदाधिका-यांनी पाठिंबा देत सहभाग घेतला.