मनोरूग्ण मुलाने केले जन्मदात्या माता- पित्यावर कु-हाडीने वार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2020 12:33 AM2020-01-04T00:33:08+5:302020-01-04T00:33:53+5:30

मनोरूग्ण मुलाने घरात झोपलेल्या आई-वडिलांवर कु-हाडीने घाव घातले. यात आईचा मृत्यू झाला असून, वडील गंभीर जखमी झाले. ही खळबळजनक घटना बदनापूर तालुक्यातील गोकुळवाडी तांडा (जि.जालना) येथे २ जानेवारी रोजी रात्रीच्या सुमारास घडली.

A psychotic child kills a mother and father with a bad breath | मनोरूग्ण मुलाने केले जन्मदात्या माता- पित्यावर कु-हाडीने वार

मनोरूग्ण मुलाने केले जन्मदात्या माता- पित्यावर कु-हाडीने वार

Next
ठळक मुद्देगोकुळवाडी तांडा : आईचा झाला मृत्यू; वडील गंभीर जखमी

बदनापूर : मनोरूग्ण मुलाने घरात झोपलेल्या आई-वडिलांवर कु-हाडीने घाव घातले. यात आईचा मृत्यू झाला असून, वडील गंभीर जखमी झाले. ही खळबळजनक घटना बदनापूर तालुक्यातील गोकुळवाडी तांडा (जि.जालना) येथे २ जानेवारी रोजी रात्रीच्या सुमारास घडली.
ठकूबाई उत्तम चव्हाण (६०) असे मयत महिलेचे नाव असून, उत्तम धुमा चव्हाण (७०) हे जखमी झाले आहेत. बदनापूर तालुक्यातील गोकुळवाडी तांडा येथील ठकुबाई चव्हाण व त्यांचे पती उत्तम चव्हाण हे २ जानेवारी रोजी रात्री घरात झोपले होते. रात्री ९ वाजण्याच्या सुमरास घरी आलेला त्यांचा मुलगा दिलीप उत्तम चव्हाण याने अचानक आई-वडिलांवर कु-हाडीचे घाव घातले. यात ठकुबाई चव्हाण यांचा जागीच मृत्यू झाला. तर उत्तम चव्हाण हे जखमी झाले. जखमी उत्तम चव्हाण यांच्यावर जालना येथील रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी भारती संजय चव्हाण या मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून दिलीप चव्हाण विरूध्द बदनापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सपोनि शाहुराज धुमाळे हे करीत आहेत. दरम्यान, दिलीप चव्हाण याच्या डोक्यावर परिणाम झाला असून, रागाच्या भरात त्याने हे कृत्य केल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे.
घरात जाण्याची होईना हिंमत
कुºहाडीने हल्ला झाल्यानंतर चव्हाण दाम्पत्यांनी आरडाओरड केली. हा आवाज ऐकून उत्तम चव्हाण यांच्या घराजवळ गर्दी झाली. मात्र, दिलीप चव्हाण याचा रौद्रावतार पाहून घरात जाण्याची हिंमत कोणीही करीत नव्हते. बदनापूर पोलीस ठाण्याचा फौजफाटा आल्यानंतर घराचे पत्रे काढून व दरवाजा तोडून पोलिसांनी आतमध्ये प्रवेश केला. घरातच बसून असलेल्या आरोपीला जेरबंद करण्यात आले. उत्तम चव्हाण यांना तीन मुले असून, एक मुलगा ऊस तोडणीसाठी बाहेरगावी गेलेला आहे. दुसरा मुलगा त्याच्या सासुरवाडीत राहतो. तिसरा दिलीप हा मनोरूग्ण असून, त्याचे लग्न झाले होते. मात्र त्याची पत्नी त्याला सोडून गेल्याचे गावकरी सांगतात. उत्तम चव्हाण यांचे कुटुंब मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करीत होते. मात्र, मुलाने केलेल्या कृत्याने या कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे.
मयत महिलेवर अंत्यसंस्कार
या घटनेतील मयत ठकुबाई चव्हाण यांच्या पार्थिवावर जालना येथील शासकीय रूग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर ३ जानेवारी रोजी त्यांचा मृतदेह त्यांच्या गावी आणण्यात आला. तेथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले़
आरोपी न्यायालयीन कोठडीत
आईचा खून करणाऱ्या दिलीप चव्हाण याला शुक्रवारी न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Web Title: A psychotic child kills a mother and father with a bad breath

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.