लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यातील अनेक गावांनी रविवारी रात्री हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडल्याने शेती कामांना वेग आला आहे. तर काही ठिकाणी पावसामुळे मोठे नुकसान झाले.शहागड, वाळकेश्वर, कुरण परिसरात पहाटे वादळ आल्याने मोठे नुकसान झाले. या वादळामुळे अनेकांची त्रेधातिरपीट उडाली, तर रस्त्यावरील हॉटेलवरील पत्रे उडाले. दरम्यान पहाटेच्या पावसामुळे शहागडसह परिसरातील सखल भागासह औरंगाबाद-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पाणी साचले होते.गोलापांगरीत पाऊसजालना तालुक्यातील गोलापांगरी परिसरात सोमवारी सकाळी जोरदार पाऊस झाला.आष्टीत मध्यरात्री पाऊसआष्टी : परतूर तालुक्यातील आष्टी परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या समाधानकारक पावसाने शेतकरी सुखावला आहे.यंदा वेळेवर मान्सूनचे आगमन झाल्याने मृग नक्षत्रामध्ये असाच पाऊस पडला यावर्षी खरिपाच्या पेरण्या जूनअखेरपर्यंत होतील.
जालना जिल्ह्यात सर्वत्र पावसाची हजेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 05, 2018 1:36 AM