‘सीएए’च्या समर्थनार्थ जालना शहरात काढली रॅली...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2019 11:53 PM2019-12-22T23:53:57+5:302019-12-22T23:55:37+5:30
नागरिकता संशोधन कायद्याच्या (सीएए) समर्थनार्थ राष्ट्रप्रेमी नागरिक कृती समितीच्या वतीने रविवारी जालना शहरातील विविध मार्गावरून रॅली काढण्यात आली.
जालना : नागरिकता संशोधन कायद्याच्या (सीएए) समर्थनार्थ राष्ट्रप्रेमी नागरिक कृती समितीच्या वतीने रविवारी जालना शहरातील विविध मार्गावरून रॅली काढण्यात आली. तसेच जनसंख्या नियंत्रण कायद्याचे बील पारित करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.
रॅलीची सुरूवात गायत्री मंत्र व राष्ट्रगिताने झाली. त्यानंतर हुतात्मा जनार्धन मामा नागपूरकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून ‘भारत माता की जय’ व ‘वंदे मातरम्’ आदी घोषणा देत रॅली काढण्यात आली. या रॅलीत शहरातील धार्मिक संघटना व विविध सामाजिक संघटनांच्या सदस्यांनी सहभाग नोंदविला.
यावेळी राष्ट्रप्रेमी नागरिक कृती समितीचे पारस नंद, जगदीश गौड, मनिष नंद, सुनील खरे, धनसिंह सुर्यवंशी, चेतन गौड, अमित कुलकर्णी, बद्री सोनी, राहुल यादव, गौरव बोरा, अर्जुन दहाडे, राम अवघड, बद्रीनाथ जांगडे, अॅड. महेंद्र सेगल, दिनेश आगीवाल, सुमित खरे, अंकुश मानधना, जगन्नाथ कातारे, अक्षय टिपरास, किशोर माधवोवाले, बबलु बटावाले, रवींद्र देशपांडे, नारायण भगत, आकाश बेनिवाल, विक्की अलीजार, बबलू नंद, अनिल भगत, नितेश सोळंके, लोकेश नवमहालकर, रवी भक्कड, कन्हैय्या गोमतीवाले, लोकेश कौरवी, राकेश बोरा, सोनू नंद, अमित आर्य यांच्यासह शहरातील राष्ट्रप्रेमी नागरिक सहभागी झाले होते. यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
शहरातील या मार्गावरून काढली रॅली
‘सीएए’च्या समर्थनार्थ शहरातील मामा चौक ते वीर सावरकर चौक, फुल बजार ते राम मंदिर, बडी सडक ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा अशी रॅली काढण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज चौकात रॅलीचा समारोप करण्यात आला. यावेळी सी.ए.ए. व एन.आर.सी. च्या समर्थनार्थ घोषणा देण्यात आली. तसेच लवकरात लवकर जनसंख्या नियंत्रण कायद्याचे बील पारित करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली. रॅलीची समारोप ‘वंदे मातरम्’ व शांती पाठाने करण्यात आला.