जालना : आज बाप्पाचे आगमन होत आहे. त्यानिमित्ताने जालन्यातील सर्व बाजारपेठा सजल्या असून, बाजारपेठामध्ये नागरिकांनी बुधवारी साहित्य खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी केली होती. शहराच्या सुरक्षेसाठी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शहरात ४३ सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. त्यामुळे आज जालनेकर मोठ्या उत्साहात बाप्पाचे स्वागत करणार आहे. परंतु, यावर्षीही बाप्पाचे आगमन खड्ड्यांतूनच होणार आहे.गणपतीची आरास मखर व सजावटीच्या साहित्याने सध्या शहरातील सर्वच बाजारपेठा सजल्या आहेत. थर्माकोल, प्लास्टिकच्या सजावटीला बंदी घालण्यात आल्याने इकोफ्रेंडली कागदी, कापडी मखरांची मागणी वाढली आहे. त्यामुळे कारगिरांकडून पर्यावरणपूरक आरास बनविण्यात येत असून, जिल्हात इकोफ्रेंडली कापडी मखरांना मोठी पसंती व मागणी असल्याचे दिसून येत आहे. प्लॉस्टिक व थर्माकोलबंदीच्या निर्णयामुळे इकोफ्रेंड्रली वस्तूंना मागणी वाढली आहे. सजावटीचे साहित्य विक्रेते थर्माकोलच्या मखरांना पर्याय देण्यासाठी व पर्यावरण संवर्धनासाठी कापडी मखर तयार करुन त्याची विक्री करण्यात येत आहे. याला नागरिकही पसंती देत आहे.फुलांनी बाजारपेठा फुलल्याआज गणरायाचे आगमन होत आहे. त्यामुळे शहरातील बाजारपेठा फुलांनी सजल्या आहे. शहरात बुलडाणा, जाफराबाद, सिल्लोड, औरंगाबाद व जालना ग्रामीण भागातून मोठ्या प्रमाणात फुलांची आवक शहरात आली. यात झेंडू, गुलाब, निशीगंध, शेवंती, गलंडा यासह आदी फुले बाजारात आली आहे. सध्या फुलाचे भाव वाढले असून, झेंडू ५० रुपये किलो, गुलाब १५०, निशीगंध ३०० रुपये किलो, गलंडा ५०, शेवंती २०० रुपये किलोंने विकत असल्याचे व्यापारी जाफर तांबोळी यांनी सांगितले.फळांची आवक वाढलीफळ बाजारात मोठ्या प्रमाणात फळांची आवक वाढली आहे. पुजेच्या फळांची खरेदी करण्यासाठी ग्राहकांनी फळांच्या गाड्यांवर गर्दी केली होती. त्यामुळे फळांची विक्री वाढली आहे. परंतु, सध्या जिल्ह्यावर दुष्काळ जण्या परिस्थिती आहे. त्यामुळे याचा परिणाम शहरातील बाजारपेठामध्ये दिसून आला.खरेदीसाठी दुकानांमध्ये गर्दीबाप्पाच्या स्वागतासाठी लागणाऱ्या साहित्य खरेदीसाठी शहरातील बाजापेठ गर्दीने फुलली आहे. पूजेचे साहित्य, सजावटीचे साहित्य, कपडे, अगरबत्ती, प्रसादासाठी मोदक, लाडू, मिठाई, मध, तूप, दही, दूध, फळे, फुले, इमिटेशन ज्वेलरी, कपडे, किराणा माल, तसेच इलेक्ट्रिकल उपकरणे खरेदीसाठी सगळ््याच दुकानात गर्दी उसळली आहे.शाडूच्या मूर्तींनाभक्तांकडून पसंतीजिल्हाभरातून शाडूच्या मूर्ती मोठ्या संख्येने बनवल्या जातात. शाडूच्या मूर्तीमुळे पर्यावरणाला धोेका निर्माण होत नाही. नागरिकांमध्ये जनजागृती होत असल्याने पर्यावरणपूरक मूर्तीची मागणी वाढल्याचे सांगण्यात आले.गणरायाचे आगमन होणार खड्ड्यांतूनआज गणरायाचे आगमन होत आहे. त्यानुसार बाप्पाच्या स्वागतासाठी जालनेकर सज्ज झाले आहे. मात्र, नादुरुस्त रस्त्यांचा ताप भाविकांना जाणवत आहे. गणेशोत्सवा अगोदर शहरातील रस्त्यांची डागडुजी करण्याचे आश्वासन नगर पालिकेने दिले होते. परंतु, नगरपालिकेने अद्यापही रस्त्यांची डागडुजी केली नाही.शहरातील काही रस्त्यांची चाळण झाली आहे. ठिकठिकाणी खड्डे पडल्याने वाहनधारकांची कसरत होत आहे. काही दिवसांपूर्वीच नगरपालिकेची सभा झाली. तेव्हा या सभेत गणरायाच्या आगमना आधी रस्त्यांची दुरुस्ती करण्यात येईल. असे सांगण्यात आले होते. परंतु, अद्यापही या रस्त्यांची दुरुस्ती करण्यात आलेली नाही.जिल्हाधिका-यांच्या हस्तेराजूरेश्वराची महापूजाराजूर : गणेश चतुर्थी निमित्त १३ रोजी सकाळी ९ वाजता श्री राजुरेश्वरास वस्त्रालंकार चढविण्यात येऊन जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांच्या हस्ते सपत्निक महापूजा करण्यात येणार आहे. यावेळी उपविभागीय अधिकारी हरिश्चंद्र गवळी, भोकरदनचे तहसीलदार तथा गणपती संस्थानचे अध्यक्ष संतोष गोरड यांच्यासह विश्वस्तांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. जिल्हयात गणेश चतुर्थीनिमित्त राजुरेश्वर यात्रेला विशेष महत्वाचे मानल्या जाते. यात्रेनिमित्त गणपती संस्थानतर्फे भाविक व व्यापा-यांसाठी सोयी सुविधा पुरवल्या जात असल्याचे गणपती संस्थानचे व्यवस्थापक गणेशराव साबळे, कार्यालयीन अधीक्षक प्रशांत दानवे यांनी सांगितले. श्री महापूजा व पालखी सोहळ्याचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही साबळे यांनी केलेआहे.
बाप्पाच्या स्वागतासाठी सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2018 12:52 AM