शेतकरी कायदे रद्द करा; स्वाभिमानीच्या चक्काजामने राजूरात वाहतूक खोळंबली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 06:14 PM2021-02-06T18:14:04+5:302021-02-06T18:14:29+5:30
या आंदोलनामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.
राजूर : केंद्र सरकारने शेतकरी विरोधी कायदे रद्दे करावेत, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने शनिवारी सकाळी राजूर चौफुली येथे चक्काजाम आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनामुळे काही काळ वाहतूक ठप्प झाली होती.
शेतकरी विरोधी कायदे रद्द करावेत, या मागणीसाठी दिल्ली येथे दोन महिन्यांपासून आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात अनेक शेतकऱ्यांना आपला जीव गमावाव लागला. तरीही केंद्र शासन शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करीत आहे. केंद्र शासनाने मागण्यांकडे लक्ष द्यावे, यासाठी शनिवारी देशभरात चक्काजाम आंदोलन करण्यात आले. त्या पार्श्वभूमीवर राजूर येथेही स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. आंदोलनकर्त्यांनी केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. आंदोलनात स्वाभिमानी युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष निवृत्ती शेवाळे, निवृत्ती शेवाळे, युवा तालुकाध्यक्ष अशोक मुटकूले, सतीश सिरसाळ, सुखदेव कुमकर, वाल्मिक शेवाळे, निवृत्ती सानप, पंजू शेवाळे, गजानन सानप, पोपट तायडे, राजू शेवाळे, शालिक तायडे, रामू काफरे, रामेश्वर घुगे आदींची उपस्थिती होती.