जिल्ह्यात २३ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:57 AM2021-02-06T04:57:02+5:302021-02-06T04:57:02+5:30
जालना : कोविड रुग्णालयात उपचार घेणाऱ्या ४४ जणांना शुक्रवारी यशस्वी उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला, तर शुक्रवारीच २३ जणांचा अहवाल ...
जालना : कोविड रुग्णालयात उपचार घेणाऱ्या ४४ जणांना शुक्रवारी यशस्वी उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला, तर शुक्रवारीच २३ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. जिल्ह्यातील बाधितांची संख्या १३ हजार ८३० वर गेली असून, आजवर ३६८ जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत १३ हजार ९२७ जणांनी कोरोनावर मात केली आहे.
जालना शहरातील ११ जणांना कोरोनाची लागण झाली. परतूर शहरातील एक, तर तालुक्यातील वाटुर येथील तिघांना कोरोनाची बाधा झाली. घनसावंगी तालुक्यातील भुतेगाव १, तर मानेपुरी येथील एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला. अंबड शहरातील एकास कोरोनाची लागण झाली. बदनापूर शहरातील १ तर तालुक्यातील भरडखेडा येथील एकास कोरोनाची बाधा झाली. जाफराबाद तालुक्यातील बुटखेडा येथील एकास तर बुलडाणा जिल्ह्यातील दोघांना कोरोनाची लागण झाली.