जाफराबाद तालुक्यातील ३७ ग्रामपंचायती महिलांसाठी राखीव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:57 AM2021-02-06T04:57:13+5:302021-02-06T04:57:13+5:30

जाफराबाद तहसील कार्यालयात जय कृष्णा फुलमाली या चिमुकल्याच्या हस्ते चिठ्ठी काढून सोडत काढण्यात आली. यावेळी उपजिल्हाधिकारी रवींद्र परळीकर, ...

Reserved for 37 Gram Panchayat women in Jafrabad taluka | जाफराबाद तालुक्यातील ३७ ग्रामपंचायती महिलांसाठी राखीव

जाफराबाद तालुक्यातील ३७ ग्रामपंचायती महिलांसाठी राखीव

googlenewsNext

जाफराबाद तहसील कार्यालयात जय कृष्णा फुलमाली या चिमुकल्याच्या हस्ते चिठ्ठी काढून सोडत काढण्यात आली. यावेळी उपजिल्हाधिकारी रवींद्र परळीकर, तहसीलदार सतीश सोनी, नायब तहसीलदार केशव डकले, गजानन चिंचोले आदींची उपस्थिती होती. सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी घाणखेडा, निमखेडा बु, कुंभारी, काळेगाव, हिवराकाबली, म्हसरुळ, चिंचखेडा, डावरगाव, तपोवन गोंधन- निमखेडा खु, शिराळा- वाढोणा, मेरखेडा, खासगाव, देवळेगव्हाण, तोंडोळी- गाढेगव्हाण, कोळेगाव, सावंगी, आढा, डोणगाव, भारज खु.- कुसळी- अंधारी, नांदखेडा- किन्ही- काचनेरा या ग्रामपंचायती आरक्षित करण्यात आल्या आहेत.

अनुसूचित जाती महिलांसाठी

टेंभुर्णी- गणेशपूर, निवडुंगा, येवता, वडाळा, सावरगाव म्हस्के, खापरखेडा- गोपी, विरखेडा भालकी- रेपाळा या ग्रामपंचायती आरक्षित झाल्या आहेत. अनुसूचित जमाती महिलांसाठी कोनड ग्रामपंचायत आरक्षित करण्यात आली आहे. नागरिकांच्या मागास प्रवर्गातील महिलांसाठी

वरखेडा विरो- सावरखेडा, कुंभारझरी, सातेफळ, चापनेर- धोंडखेडा, हनुमंतखेडा, सावरखेडा गोंधन, डोलखेडा खु., वरुड खु, सोनगिरी, बोरगाव बु.- बोरगाव म.- बोरी खु. आरक्षित करण्यात आल्या आहेत.

Web Title: Reserved for 37 Gram Panchayat women in Jafrabad taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.