महसूल पथकावरील हल्ला प्रकरणात गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2019 12:41 AM2019-12-20T00:41:34+5:302019-12-20T00:41:53+5:30
अवैध वाळू उपशाविरूध्द कारवाईसाठी गेलेल्या महसूल पथकावर मंगळवारी रात्री वाळू माफियांनी हल्ला चढविला होता. या प्रकरणात परतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, घटना सेलू पोलिसांच्या हद्दीत घडल्याने हे प्रकरण सेलू ठाण्याकडे वर्ग करण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
परतूर : अवैध वाळू उपशाविरूध्द कारवाईसाठी गेलेल्या महसूल पथकावर मंगळवारी रात्री वाळू माफियांनी हल्ला चढविला होता. या प्रकरणात परतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, घटना सेलू पोलिसांच्या हद्दीत घडल्याने हे प्रकरण सेलू ठाण्याकडे वर्ग करण्यात आले आहे.
परतूर- सेलू मार्गावर अवैध वाळू उपसा करणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी महसूलचे पथक मंगळवारी रात्रीच्या सुमारास गेले होते. यावेळी एका वाहनातून आलेल्या दहा ते बारा व्यक्तींनी पथकावर हल्ला केला. त्यावेळी पथकातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी वाहन सोडून सतोना (खु.) गावच्या दिशेने पळ काढला. काही वेळाने अज्ञात व्यक्तींनी घटनास्थळावरील वाहन उलथून टाकून त्याच्या काचा फोडल्या. या प्रकरणी चालक शेख अब्दुल अतिक यांच्या तक्रारीवरून अज्ञात हल्लेखोरांविरूध्द परतूर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
हल्लेखोरांनी महसूलच्या वाहनावर हल्ला केल्यानंतर वाहनाची नासधूस केली. दुस-या दिवशी घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर वाहनात बीअरच्या बाटल्या आढळून आल्या आहेत. त्यात तक्रार देण्यासही विलंब झाल्याने प्रकरणाचे गूढ वाढू लागले आहे.