कदीम पोलीस ठाण्यातील ‘पीओपी’चे छत कोसळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2019 12:35 AM2019-11-04T00:35:57+5:302019-11-04T00:36:11+5:30
शहरातील कदीम पोलीस ठाण्यातील वायरलेस कक्षातील ‘पीओपी’ केलेला छत रविवारी सायंकाळी कोसळला
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : शहरातील कदीम पोलीस ठाण्यातील वायरलेस कक्षातील ‘पीओपी’ केलेला छत रविवारी सायंकाळी कोसळला. सुदैवाने या घटनेवेळी या कक्षात कोणीही कर्मचारी नव्हते.
कदीम पोलीस ठाण्याची इमारत खूपच जुनी असून, ती जीर्ण झाली आहे. वेळोवेळी डागडुजी करून या ठाण्यात कामकाज केले जात आहे. गत काही दिवसांपासून सतत पडणाऱ्या पावसामुळे ठाण्याच्या इमारतीच्या भिंतींमध्ये पाणी झिरपले होते. यातूनच ठाण्यातील वायरलेस कक्षात केलेल्या पीओपीचा काही भाग रविवारी सायंकाळी कोसळला. सुदैवाने या कक्षात कोणीही नव्हते. दरम्यान, या ठाण्याच्या इमारतीसाठी निधी प्राप्त झाला आहे. मात्र, दुरूस्तीचे काम अद्यापही हाती घेण्यात आलेले नाही. ठाण्याच्या इमारतीची अवस्था पाहता तातडीने निधीचा वापर करून इमारत बांधावी, अशी मागणी होत आहे.