लोकमत न्यूज नेटवर्कजालना : तालुक्यातील नाव्हा येथील प.पू. सद्गुरू रंगनाथ महाराज यांच्या पुण्यतिथी सोहळ्यास मंगळवारासून प्रारंभ झाला. यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.१९ ते २६ नोव्हेंबर दरम्यान सकाळी ६ ते ९ या वेळेत समाधी अभिषेक, सकाळी ८ ते ११ पादुका अभिषेक होत आहे. तसेच ज्ञानेश्वरी पारायण, नामंवत कीर्तनकारांची कीर्तने, काकाड भजन, श्रीमद् भागवत कथेच आयोजन करण्यात आले आहे. मंगळवारी भगवानमहाराज आनंदगडकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.रात्री गणेश महाराज कोल्हे यांचे कीर्तन झाले. बुधवारी सोपान महाराज डोंगरे यांचे प्रवचन तर भगवानमहाराज मोहिते यांचे कीर्तन झाले. या कार्यक्रमांना भाविकांची लक्षणीय उपस्थिती होती. रविवारी रोजी विष्णू महाराज जाधव यांचे प्रवचन तर विष्णू महाराज क्षीरसागर यांचे कीर्तन होणार आहे. भिकाजी मोठे महाराज, प्रभुदेव महाराज येदलापूरकर यांचे कीर्तन होणार आहे.२६ नोव्हेंबर रोजी अनिरूद्ध महाराज क्षीरसागर यांचे सकाळी साडेदहा वाजता काल्याचे कीर्तन होणार आहे. २५ नोव्हेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजता महाआरती, दुपारी एक ते पाच महाप्रसाद तर रात्री दहा वाजता सद्गुरू रंगनाथ महाराजांची मिरवणूक निघणार आहे. या सोहळ्याचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आनंदी आत्मानंद सरस्वती उर्फ रंगनाथ महाराज विश्रांती मठ, विश्वस्त मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
सद्गुरू रंगनाथ महाराज पुण्यतिथी महोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2019 12:53 AM