चार दिवसांत १४५४ अर्जांची विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2020 04:17 AM2020-12-28T04:17:08+5:302020-12-28T04:17:08+5:30

अंबड : तालुक्यातील ८१ ग्रामपंचायतींची रणधुमाळी चांगलीच पेटली आहे. आजवर तब्बल १४५४ उमेदवारी अर्जांची विक्री झाली आहे. तर जात ...

Sale of 1454 applications in four days | चार दिवसांत १४५४ अर्जांची विक्री

चार दिवसांत १४५४ अर्जांची विक्री

Next

अंबड : तालुक्यातील ८१ ग्रामपंचायतींची रणधुमाळी चांगलीच पेटली आहे. आजवर तब्बल १४५४ उमेदवारी अर्जांची विक्री झाली आहे. तर जात वैधता प्रमाणपत्र मिळावे, यासाठीही इच्छुकांची मोठी धावपळ सुरू आहे.

अंबड तालुक्यातील ७१ ग्रामपंचायतींतील २३४ प्रभागांतून ६२७ सदस्य निवडले जाणार आहेत. गत चार दिवसांत संबंधित गावांतील इच्छुकांनी १४५४ अर्ज विकत घेतले आहेत. ग्रामपंचायतीमधील मागासवर्गासाठी राखीव जागांवर निवडणूक लढविण्यास इच्छुक असलेल्या व ज्यांच्याकडे जात वैधता प्रमाणपत्र नाही, अशा अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील उमेदवारांनी जात वैधता प्रमाणपत्रासाठी जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे अर्ज सादर करण्याच्या प्रक्रियेमध्ये अंशत: बदल करण्यात आलेला आहे. आता संबंधित मागासवर्गीय अर्जदारांनी सर्वप्रथम त्याचे जात प्रमाणपत्र पडताळणीचे अर्ज ऑनलाइन पद्धतीने वेबपोर्टलवर भरून त्यासोबत आवश्यक पुरावे अपलोड करणे आवश्यक आहे. त्यानंतर सदर ऑनलाइन अर्जाची प्रिंट घेऊन सदर हार्डकॉपी व इतर आवश्यक पुरावे पूर्वीप्रमाणेच विहित कार्यपद्धतीने तहसील कार्यालयामार्फत समिती कार्यालयाकडे जमा करणे आवश्यक आहे.

तालुक्यात होत असलेल्या सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये विद्यमान पालकमंत्री राजेश टोपे यांचे पाथरवाला व माजी आमदार शिवाजीराव चोथे यांचे शहागड यासह विविध राजकीय पक्षांचे जिल्हाध्यक्षांचे होमटाऊन तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विविध पदाधिकाऱ्यांच्या गावांतील निवडणुका होत आहेत. त्यामुळे या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये चांगलीच रंगत पाहायला मिळत आहे. नोव्हेंबरमध्ये मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा यामध्ये समावेश आहे. विविध राजकीय पक्षांनी कंबर कसली असून, गावपातळीवरील सत्ता केंद्र आपल्याच गटाच्या ताब्यात असावे, यासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू आहे.

निवडणुकांचा मोठा टप्पा

तालुक्यात मोठ्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा हा टप्पा होत आहे. त्यामुळे सत्ता केंद्र आपल्याच ताब्यात राहावी, यादृष्टीने राजकीय पक्षाचे नेते, कार्यकर्ते मोर्चेबांधणी करीत आहेत. तसेच गावागावातील कार्यकर्त्यांशी संपर्क साधत आहेत. विशेषत: बंडखोरी होणार नाही, याची सर्वाधिक दक्षता प्रमुख पक्षांचे पदाधिकारी स्वत: घेताना दिसत आहेत.

Web Title: Sale of 1454 applications in four days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.