विनयभंगप्रकरणी तीन वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 04:57 AM2021-02-06T04:57:08+5:302021-02-06T04:57:08+5:30
एक अल्पवयीन मुलगी ६ जानेवारी २०१४ रोजी पाणी भरण्यासाठी गेली होती. त्याचवेळी रमेश लक्ष्मण घोरपडे याने मुलीचा विनयभंग केला. ...
एक अल्पवयीन मुलगी ६ जानेवारी २०१४ रोजी पाणी भरण्यासाठी गेली होती. त्याचवेळी रमेश लक्ष्मण घोरपडे याने मुलीचा विनयभंग केला. तिने घडलेला प्रकार आईला सांगितला. त्यानंतर सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तपास करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या प्रकरणात समोर आलेले पुरावे, सहायक सरकारी वकील अॅड. वर्षा मुकीम यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश स. गो. देशमुख यांनी आरोपी रमेश लक्ष्मण घोरपडे याला ३५३ भादंविनुसार दोन वर्षे सश्रम कारावास व १ हजार रुपयांचा दंड ठोठावला, तसेच तीन वर्षे सश्रम कारावास व एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावल्याची माहिती वर्षा मुकीम यांनी दिली.