लोकमत न्यूज नेटवर्कजाफराबाद : तालुक्यात पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांची वणवण भटकंती सुरू झाली आहे. यामुळे ठिक- ठिकाणच्या ग्राम पंचायतच्या सार्वजनिक पाणी- पुरवठा योजना पाण्याअभावी ओस पडल्या आहेत. त्यामुळे बहुतांश ग्रामपंचायत, सरपंच व पदाधिकाऱ्यांनी पंचायत समिती पाणी पुरवठा विभागाकडे टँकर व विहीरी अधिग्रहण मागणीचे प्रस्ताव पाठविले आहेत. त्यानुसार तात्पुरत्या उपाय योजना करण्यात आल्या आहेत.तालुक्यातील १०१ गावांपैकी ६८ गावांत मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भीषण पाणी समस्या जाणवू लागली आहे.४८ गावे १ वाडी वस्तीसह ५३ ठिकाणी टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू करण्यात आला आहे. २० गावांसाठी २१ खाजगी विहिरी अधिग्रहण करण्यात येऊन ग्राम पंचायतीच्या सार्वजनिक पाणी पुरवठा योजनेत सोडण्यात येऊन पाणी पुरवठा करण्यात येत आहे.
६८ गावांमध्ये पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2019 12:24 AM