वीज वितरण कंपनीचा थकबाकीदारांना शॉक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2018 12:53 AM2018-11-25T00:53:40+5:302018-11-25T00:53:54+5:30

वीज वितरण कंपनीने वारंवार सूचना देऊनही थकबाकी न भरल्याने ग्राहकांकडे कोट्यवधी रूपये थकले आहेत. ते वसूल करण्यासाठी शनिवारी मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांच्यासह अधीक्षक अभियंता कैलास हुमणे आणि दोन्ही कार्यकारी अभियंता वसूलसाठी रस्त्यावर उतरले

Shock to the power distribution company's defaulters | वीज वितरण कंपनीचा थकबाकीदारांना शॉक

वीज वितरण कंपनीचा थकबाकीदारांना शॉक

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : वीज वितरण कंपनीने वारंवार सूचना देऊनही थकबाकी न भरल्याने ग्राहकांकडे कोट्यवधी रूपये थकले आहेत. ते वसूल करण्यासाठी शनिवारी मुख्य अभियंता सुरेश गणेशकर यांच्यासह अधीक्षक अभियंता कैलास हुमणे आणि दोन्ही कार्यकारी अभियंता वसूलसाठी रस्त्यावर उतरले होते. एकाच दिवशी जवळपास दहा लाख रूपयांपेक्षा अधिकचे वीजबिल वसूल झाल्याची माहिती मुख्य अभियंता गणेशकर यांनी दिली.
जालना शहर व जिल्ह्यात वीज घरगुती तसेच व्यावसायिक वीज ग्राहकांकडे कोट्यवधी रूषयांची थकबाकी आहे. ती वसूल व्हावी म्हणून वीज वितरण कंपनीने यापूर्वीही त्यांना नोटीस देऊन ती थकबाकी भरावी म्हणून सूचना केली होती. मात्र ग्राहक थकबाक भरण्यास या ना त्या कारणाने चालढकल करत असल्याचे दिसून आले. यावर उपाय म्हणून वीज वितरण कंपीनच्या व्यवस्थापनाने आता वसुलीची टक्केवारी वाढविण्यासाठी अधिकाऱ्यांना कॅबिन सोडून रस्त्यावर उतरून ग्राहकांकडून वीज बिल वसूल करण्याचे निर्देश दिले आहेत. याचाच एक भाग म्हणून ही कारवाई करण्यात आली. दरम्यान शनिवारी केलेल्या कारवाईत औद्योगिक वसहातीतील २६ वीज कनेक्शन तोडली असून, त्यांच्याकडून ८ लाख ७८ हजार रूपये वसूल केले आहेत. तर व्यावसायिक वीज वापर करणा-यांचे जवळपास ९५ वीज जोडणी तोडली असून, त्यांच्याकडून ९ लाख ५९ हजार रूपये वीज बिल भरून घेतले. तसेच घरगुती वापारच्या जवळपास १५८ वीज ग्राहकांचा वीजपुरवठा तोडला असून, त्यांच्याकडून १५ लाख रूपये वसूल केल्याची माहिती अधीक्षक अभियंता कैलास हुमणे यांनी दिली.
कारवाईने खळबळ
शनिवारी वीज वितरण कंपनीचे जे भरारी पथक वीज ग्राहकांच्या घरी दाखल झाल्यावर एकच गोंधळ उडाला. अनेकांनी साहेब आमच्याकडे पैसे नसल्याचे कारण पुढे केले तर, काहींनी वीज मीटरमध्ये एक रिडींग आणि बिलावर दुसरी रिडींग येत असल्याच्या तक्रारी अधिका-यांकडे केल्याने अधिका-यांनी याची गंभीर दखल घेतली जाईल असे सांगण्यात आले. या वीज वितरणच्या कारवाईची दिवसभर शहरात उलट-सुलट चर्चा होती.यातून ३० लाख जमा झाले.

Web Title: Shock to the power distribution company's defaulters

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.