शु छे?, तमे केम छो?, तमारा स्कूल नू नाम शु छे ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2018 12:34 AM2018-11-29T00:34:52+5:302018-11-29T00:35:37+5:30
सध्या जि. प. च्या शाळेतून भाषा संगम कार्यक्रमाने चांगलीच उभारी घेतली असून विद्यार्थी मोठ्या आवडीने परप्रांतीय भाषेतील पाच वाक्ये आपसात बोलत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
टेंभुर्णी : सध्या जि. प. च्या शाळेतून भाषा संगम कार्यक्रमाने चांगलीच उभारी घेतली असून विद्यार्थी मोठ्या आवडीने परप्रांतीय भाषेतील पाच वाक्ये आपसात बोलत आहेत.
इतकेच नाही तर या माध्यमातून काही शाळेतील विद्यार्थी थेट दुसऱ्या राज्यात संपर्क साधून विद्यार्थ्यांशी संवाद साधणेही सुरू केले आहे. बुधवारी या कार्यक्रमांंतर्गत गुजराथी भाषेचा सराव विद्यार्थ्यांना दिला गेला. दरम्यान या दिवशी जाफराबाद गटसाधन केंद्राचे साधन व्यक्ती तथा या उपक्रमाचे तालुका समन्वयक दादा जगदाळे यांनी तालुक्यातील डावरगाव देवी शाळेला भेट दिली. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांचा गुजराथी भाषेचा सराव अगोदरच शिक्षकांनी घेतला होता. यावेळी जगदाळे यांनी गुजरात राज्यातील अहमदाबाद येथील एफ. डी. बॉईज हायस्कूल चा मोबाईल नंबर आॅन लाईन प्राप्त करून तेथील मुख्याध्यापकांना विद्यार्थ्यांसोबत संवाद साधण्याची विनंती केली. त्या मुख्याध्यापकांनीही लगेच होकार देऊन विद्यार्थी- विद्यार्थी संवाद.घडवून आणला.
यावेळी डावरगाव देवी येथील इयत्ता आठवीतील विद्यार्थी गायत्री नवले व सूरज अढावे यांनी नमस्कार, तमारू नाम शु छे?, तमे केम छो?, तमारा स्कूल नू नाम शु छे ? आदी छोटी वाक्ये बोलून तेथील १० वीतील विद्यार्थ्यांशी संपर्क साधला. यावेळी अचानक झालेल्या या भावनिक संवादाने दोन्ही कडील विद्यार्थी भारावून गेले.
यावेळी सेवानिवृत्त विस्तार अधिकारी एस.डी.नवले, टेंभुर्णीचे केंद्रप्रमुख गणेश पवार, केंद्रीय मुख्याध्यापक आर.डी.लहाने, डावरगाव चे मुख्याध्यापक महेश अहीरे, शिक्षक जमीर शेख, गोविंद जाधव, तुळशीराम जाधव सुखदेव वर्गणे, रत्ना देशमुख, पुष्पा साखरे, संतोष अढावे, रवी पैठणे आदींची उपस्थिती होती.