'साहेब,आरक्षण द्या, माझ्या बाळाला अन्नपाणी नाही'; उपोषणस्थळी जरांगेंच्या आईंना अश्रू अनावर

By विजय मुंडे  | Published: September 8, 2023 02:44 PM2023-09-08T14:44:34+5:302023-09-08T14:44:52+5:30

आईने घातलेली आर्तसाद आणि दोघांच्या डोळ्यातून ओघळणारे अश्रू उपस्थितांचे मन हेलावून टाकत होते.

'Sir, give reservation, my baby has no food and water'; Manoj Jarange's mother at the place of hunger strike in Aantrawali Sarati | 'साहेब,आरक्षण द्या, माझ्या बाळाला अन्नपाणी नाही'; उपोषणस्थळी जरांगेंच्या आईंना अश्रू अनावर

'साहेब,आरक्षण द्या, माझ्या बाळाला अन्नपाणी नाही'; उपोषणस्थळी जरांगेंच्या आईंना अश्रू अनावर

googlenewsNext

जालना: साहेब, आरक्षण द्या; दहा दिवस झाले माझ्या बाळाला अन्न नाही, पाणी नाही. सरकारने माझ्या बाळाला न्याय द्यावा, अशी आर्त साद उपोषणकर्ते मनोज जरांगे यांच्या आईने घातली.

मराठा आरक्षणासाठी मागील अकरा दिवसांपासून मनोज जरांगे हे अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण करत आहेत. आज मातोरी (ता. गेवराई) गावातील सर्व जाती-धर्माच्या महिला, पुरुषांनी अंतरवाली सराटी येथील उपोषण स्थळी धाव घेतली. त्यावेळी जरांगे यांची आई ही उपस्थित होती. जरांगे यांच्या हाताला लावलेले सलाईन पाहून त्यांच्या आईला गहिवरून आले होते. साहेब, आरक्षण द्या; दहा दिवस झालं माझ्या बाळाला अन्न नाही, पाणी नाही. साहेब माझ्या बाळाला न्याय द्या, अशी आर्त साद आईने घातली. आईने घातलेली आर्तसाद आणि दोघांच्या डोळ्यातून ओघळणारे अश्रू उपस्थितांचे मन हेलावून टाकत होते. यावेळी उपस्थित ग्रामस्थांनीही मनोज जरांगे यांच्या बेमुदत उपोषणाला पाठिंबा दिला.

माझे आई-बाप महाराष्ट्र
आपापसातील मतभेद विसरा. महाराष्ट्रातील पाच कोटी मराठ्यांचं भलं करायचा असेल तर वैयक्तिक वाद दूर ठेवा, शांततेत आंदोलन करा. माझ्या गावातील सर्व जाती-धर्माचे लोक इथे आले आहेत. माझी आई ही आली आहे. अनेक जण माझ्या कानात सांगतात आईचा उल्लेख करा. पण आई माझा महाराष्ट्र बाप माझा महाराष्ट्र. मी आज समाजाचा आहे. घरी गेल्यानंतर मी तुमचा आहे, असे मनोज जरांगे म्हणताच उपस्थितांनी एक मराठा लाख मराठा च्या घोषणा दिल्या.

Web Title: 'Sir, give reservation, my baby has no food and water'; Manoj Jarange's mother at the place of hunger strike in Aantrawali Sarati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.