केवळ आठ महिन्यांत दाखल झाले ५०० गुन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2019 12:04 AM2019-09-15T00:04:15+5:302019-09-15T00:04:47+5:30

अंबड तालुक्यातील गोंदी पोलीस ठाण्यांतर्गत गुन्हेगारीत वाढ झाली असून, आठ महिन्यांत विविध प्रकारचे तब्बल ५०० गुन्हे दाखल झाले आहेत.

Six offenses were registered in just eight months | केवळ आठ महिन्यांत दाखल झाले ५०० गुन्हे

केवळ आठ महिन्यांत दाखल झाले ५०० गुन्हे

Next

इरफान सय्यद ।
लोकमत न्यूज नेटवर्क
शहागड : अंबड तालुक्यातील गोंदी पोलीस ठाण्यांतर्गत गुन्हेगारीत वाढ झाली असून, आठ महिन्यांत विविध प्रकारचे तब्बल ५०० गुन्हे दाखल झाले आहेत. विशेषत: दाखल असलेल्या चोऱ्या, घरफोड्यांमधील काहीच प्रकरणांचा उलगडा झाला असून, इतर प्रकरणांचा तपास गुलदस्त्यात आहे.
गोंदी पोलीस ठाण्यांतर्गत तिर्थपुरी (ता. घनसावंगी), शहागड (ता.अंबड) येथे दोन पोलीस चौकी आहेत. तर ठाण्यांतर्गत शंभर ते सव्वाशे किलोमीटर हद्दीत ९२ गावे आहेत. इतका मोठा व्याप असतानाही ठाण्याच्या दिमतीला एकच शासकीय गाडी आहे. चालू वर्षात गोंदी पोलीस ठाणे हद्दीतील विविध प्रकारच्या घटनांचे ४९४ गुन्हे दाखल झाले आहेत. यातील ३९४ गुन्हे उघडकीस आले आहेत. १०० गुन्ह्यांचा तपास प्रलंबित आहे. अपघात चोऱ्यांचे प्रमाणही वाढले आहे.
गोंदी ठाणे वगळता तीर्थपुरी, शहागड पोलीस चौकीला २२ गावे आहेत. मात्र, शहागड पोलीस चौकीतील नादुरूस्त जीप दुरूस्त होऊन परत आलेली नाही. त्यामुळे शहागड पोलिसांची पेट्रोलिंग बंद आहे. वाहन नाही, गस्त नाही, त्यामुळे पोलिसांचा वचक कमी होत असून, चोरट्यांना संधी मिळत आहे. आज या गल्लीत तर उद्या दुस-या गल्लीत चोरटे आल्याच्या चर्चेला उधाण येत असून, घडणा-या घटनांमुळे दहशत वाढत आहे. त्यामुळे शहागड चौकीसाठी स्वतंत्र वाहनाची व्यवस्था करण्याची गरज व्यक्त होत आहे.
एक निरीक्षक, दोन उपनिरीक्षक
गोंदी पोलीस ठाण्यात एक पोलीस निरीक्षक व दोन उपनिरीक्षक आहेत. शहागडसह परिसरात एखादी घटना घडली तर गोंदी पोलीस ठाण्यात कळवून ठाण्यातून वाहन येईपर्यंत अधिकारी, कर्मचा-यांना वाट पाहावी लागते. तोपर्यंत बराच वेळ निघून गेलेला असतो. तसेच काही वेळा खाजगी वाहन वापरले जाते.
चोरटे
साधतात पहाटेची वेळ
शहागडसह परिसरात एक, अंकुशनगरला येडशी-औरंगाबाद राष्ट्रीय महामार्गावर एक, कुरणला एक दरोडा, तसेच तीन चो-या झाल्या आहेत. तर नागरिक सतर्क राहिल्याने अनेकवेळा चोर पळाल्याची परिसरात चर्चा आहे. या सर्व घटना पहाटे एक ते तीन वाजण्याच्या दरम्यान घडल्या आहेत.
वरिष्ठांनी लक्ष देण्याची होतेय मागणी
शहागड पोलीस चौकीच्या हद्दीत वाढलेल्या चो-यांसह इतर घटनांमध्ये वाहन नसल्याने पोलिसांची गैरसोय होत आहे. रात्रीची गस्त बंद पडली आहे. येथील बसस्थानक परिसर, बोगदा व इतर ठिकाणी चोर दडी मारून बसतात. पहाटे एक ते तीनच्या दरम्यान चो-या केल्या जात आहेत. त्यामुळे शहागड चौकीला एक स्वतंत्र वाहन, वाढीव कर्मचारी देऊन रात्रीची गस्त वाढविण्याची मागणी सय्यद तारेख, लक्ष्मण धोत्रे, इकबाल शेख, श्रीरंग मापारी, अपसर शेख, शफीक तांबोळी, गणेश पागीरे, संतोष जाधव, परमेश्वर जवणे आदींनी केली आहे.

Web Title: Six offenses were registered in just eight months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.