जालना : नाफेड अंतर्गत जालना जिल्ह्यात सोयाबीन, उडीद, मूग हमीभावाने खरेदी करण्यासाठी पाच ठिकाणी हमीभाव खरेदी केंद्रे सुरू करण्यात आले आहेत. या खरेदी केंद्रावर नोंदणी करण्यासाठी तिसऱ्या वेळेस १५ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.हमीभावाने उडीद, मूग, सोयाबीन खरेदीसाठी नोंदणी करण्याचा कालावधी १५ सप्टेंबर ते १५ नोव्हेंबर या कालावधीत होता. शासनाने या नोंदणीसाठी आता १५ डिसेंबर पर्यंत मुदतवाढ दिली आहे. नाफेड मार्फत जिल्ह्यातील जालना, अंबड, भोकरदन, तीर्थपुरी, मंठा या पाच ठिकाणी ही हमीभाव खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. यात उडदाला ५७०० रूपये, मुगाला ७५०० रूपये तर सोयाबीनला ३७०० रूपये हमीभाव देण्यात येणार आहे. आॅनलाईन पोर्टलद्वारे शेतकऱ्यांनी नाव नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा मार्केटींग अधिकारी गजानन मगरे, जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण यांनी केले आहे.१०७ शेतक-यांची नोंदणीजिल्ह्यातील पाचही हमीभाव खरेदी केंद्रावर आजवर १०७ शेतक-यांनी आॅनलाईन पध्दतीने नोंदणी केली आहे. यात मुगासाठी ७३, उडीद ०३ तर सोयाबीनसाठी ३१ शेतकºयांनी नोंदणी केली आहे.
सोयाबीन, उडीद, मूग नोंदणीस मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2019 12:11 AM