तीन तास रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2018 12:44 AM2018-09-12T00:44:40+5:302018-09-12T00:45:14+5:30
चिखली-हिवरा राळा व चिखली - आन्वी या दोन रस्त्यांची कामे त्वरित सुरू करावीत, या मागणीसाठी विद्यार्थी, महिलांसह ग्रामस्थांनी तीन तास दाभाडी- राजूर रोडवर रास्ता रोको केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
बदनापूर : तालुक्यातील चिखली-हिवरा राळा व चिखली - आन्वी या दोन रस्त्यांची कामे त्वरित सुरू करावीत, या मागणीसाठी विद्यार्थी, महिलांसह ग्रामस्थांनी तीन तास दाभाडी- राजूर रोडवर रास्ता रोको केला.
या दोन रस्त्यांचे खडीकरण व डांबरीकरण त्वरित सुरू करावे या प्रमुख मागणीसह सोमवारी दाभाडी-राजूर रोडवरील चिखली पाटीवर रास्ता रोको करण्यात आला. हा रास्ता रोको दुपारी एक ते दीड वाजेपर्यंत सुरू होता. यावेळी रोडवर वाहतूक खोळंबली होती.
यावेळी आंदोलकांनी मागणी पूर्ण होईपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, अशी भूमिका घेतल्यामुळे प्रशासन व पोलिसांची तारांबळ उडाली होती. सदर रस्त्यांच्या मागणीबाबत १५ सप्टेंबर रोजी चिखली ग्रामपंचायत कार्यालयात बैठक घेण्याचे लेखी आश्वासन यावेळी आंदोलनकर्त्यांना देण्यात आले. यावेळी नायब तहसीलदार राजपूत यांनी आंदोलनकर्त्यांना आश्वस्त केले. दरम्यान या रास्ता रोकोमुळे वाहनधारकांची मोठी तारांबळ उडाली.