आकर्षक प्रात्यक्षिकांनी जालनेकर अचंबित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2018 01:03 AM2018-09-03T01:03:43+5:302018-09-03T01:10:11+5:30
महाराष्ट्र राज्य जिम्नॅस्टिक असोसिएशन आणि जालना जिल्हा निम्नॅस्टिक असो. यांच्या संयुक्त विद्यमाने जालन्यात राज्यस्तरीय एरोबिक्स आणि जिम्नॅस्टिक स्पर्धा येथील जिल्हा क्रीडा संकुलात पार पडल्या
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : महाराष्ट्र राज्य जिम्नॅस्टिक असोसिएशन आणि जालना जिल्हा निम्नॅस्टिक असो. यांच्या संयुक्त विद्यमाने जालन्यात राज्यस्तरीय एरोबिक्स आणि जिम्नॅस्टिक स्पर्धा येथील जिल्हा क्रीडा संकुलात पार पडल्या. या स्पर्धेत एकूण १८ जिल्ह्यातील वेगवेगळ्या वयोगटातील २०० पेक्षा अधिक खेळाडू सहभागी झाले होते. यावेळी मुला-मुलींनी केलेल्या आकर्षक प्रात्यक्षिकांनी जालनेकरांच्या डोळ्याची पारणे फेडली. अनेक खेळांडूंचे शरीर हे एखाद्या रबरा प्रमाणे लवचिक असल्याचे यावेळी दिसून आले.
या संघटनेचे राज्य असोसिएशनचे सचिव मकरंद जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धा पार पडल्या प्रकृती अस्वास्थामुळे ते या स्पर्धेला हजर राहू शकले नसल्याचे सांगण्यात आले. मात्र या स्पर्धा नियोजनात त्यांचा सिंहाचा वाटा असल्याची माहिती या संघटनेचे जालना जिल्हा अध्यक्ष निवृत्त प्राचार्य डॉ. रमेश अग्रवाल यांनी दिली.