जालना : आदर्श शिक्षक पुरस्कार त्वरित जाहीर करावे, शिक्षकांना स्पर्धा परीक्षेस बसण्याची परवानगी मिळावी, यासह विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेच्यावतीने जिल्हा परिषद कार्यालयासमोर शनिवारी आंदोलन करण्यात आले.वैद्यकीय प्रतिपूर्ती, दीर्घ मुदती रजा व अन्य संबंधी पुरवणी देयके निकाली काढण्यात यावी, मूळ सेवा पुस्तिका पडताळणीसाठी तालुकास्तरावर शिबीर आयोजित करण्यात यावे. दिव्यांग संवर्गाची जेष्ठता सूची प्रसिध्द करावी, यासह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे अध्यक्ष मंगेश जैवाळ, भगवान जायभाये, एकनाथ मुळे, विकास पोथरे, नितीन आरसूळ, शामसुंदर उगले, तानाजी राठोड, वैशाली कुलकर्णी, भारत गडदे, जिजा वाघ, मोतीलाल रायसिंग, संतोष देशपांडे, सुनील ढाकरके, ईश्वर गाडेकर, जगनाथ शिंदे, कैलास उबाळे, संजय जाधव, निलेश सोमवंशी, श्रीकृष्ण तौर, रामप्रभू मुंडे, सुरेखा फेदराम, दुशाला गोंडे आदींची उपस्थिती होती.
‘झेडपी’समोर शिक्षकांचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2019 12:20 AM