उपविभागीय अधिकाऱ्यांच्या पथकाचा जुगार अड्ड्यावर छापा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2021 04:29 AM2021-04-18T04:29:30+5:302021-04-18T04:29:30+5:30
जालना : बदनापूर पोलीस ठाणे हद्दीतील जालना -औरंगाबाद रोडवरील छावा हॉटेलवर सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर जालना उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या ...
जालना : बदनापूर पोलीस ठाणे हद्दीतील जालना -औरंगाबाद रोडवरील छावा हॉटेलवर सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर जालना उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकाने रविवारी दुपारी साडेतीन वाजता छापा टाकून १९ जणांना ताब्यात घेतले. तर एक जण घटनास्थळावरून पळून गेला. त्यांच्याकडून जुगार साहित्यासह १४ मोबाईल असा १ लाख ८८ हजार ८५० रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
बदनापूर पोलीस ठाणे हद्दीतील जालना- औरंगाबाद रोडवरील छावा हॉटेलवर काहीजण पैसे लावून जुगार खेळत असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर खिरडकर, विठ्ठल खार्डे यांना मिळाली. या माहितीवरून सदर ठिकाणी पंचासमक्ष छापा टाकला असता, काहीजण ५२ पत्यांचा जुगार खेळताना दिसले. पोलिसांनी यातील १९ जणांना अटक केली असून, एकजण पळून गेला आहे. शेख शब्बीर मुन्नू (औरंगाबाद), लखन विठ्ठल मानकर (जालना), शेख फारूख शेख रोषण (रा. देऊळगाव राजा), रामेश्वर विठ्ठल खैरे (सामनगाव ता. जि. जालना), कुंदन नारायण गौमतीवाले (जालना), ज्ञानेश्वर दौलत काळे (नजिक पांगरी ता. बदनापूर), बळीराम प्रभाकर नेमाणे (सामनगाव, ता. जालना), मनमत रामभाऊ चौढे, आसाराम प्रभू नेमाणे, गणेश अंबादास लोखंडे, प्रल्हाद नारायण महाडिक, सय्यद हसन सय्यद ईसा, मनोज प्रभाकर कारेगावकर, शिवकुमार सर्जेराव सिरसाठ, उदय कपील यादव, मधुकर मोहन निकाळजे, किसन सवडे, दिनेश चतृसिंग तिलवारे, प्रदीप प्रल्हाद पाटील व घटनास्थळावरून पळून गेलेला विठ्ठल माने याच्याविरूद्ध विठ्ठल खार्डे यांच्या फिर्यादीवरून बदनापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.