‘त्या’ जप्त वाळू साठ्यांचा होणार लिलाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2018 12:50 AM2018-09-21T00:50:02+5:302018-09-21T00:50:20+5:30

जालना जिल्ह्यातील विविध ठिकाणी जप्त केलेल्या वाळू साठ्यांचे नव्याने लिलाव करण्याचा निर्णय अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे.

'Those' seized sand stocks will be auctioned | ‘त्या’ जप्त वाळू साठ्यांचा होणार लिलाव

‘त्या’ जप्त वाळू साठ्यांचा होणार लिलाव

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : जालना जिल्ह्यातील विविध ठिकाणी जप्त केलेल्या वाळू साठ्यांचे नव्याने लिलाव करण्याचा निर्णय अप्पर जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आहे. त्यासाठी ई-आॅप्शन मागविण्यात आले आहेत. हा लिलाव करून त्यातून जिल्हा प्रशासनाला मोठा महसूल मिळणार असल्याचे सांगण्यात आले.
या संदर्भात माहिती अशी, गेल्या दोन महिन्यात जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे तसेच पोलीस अधीक्षक एस.चैतन्य, अप्पर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांनी वाळू साठ्यांवर कारवाई केली आहे. त्यांनी केलेल्या या कारवाईतील जप्त वाळू साठ्यातूनही वाळूची चोरी होत असल्याचे दिसून आल्यावर प्रशासनाने हा लिलाव करण्याचा निर्णय घेतला आहे. या वाळू लिलावातून साधारपणे २८ लाख रूपये मिळतील अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे. या साठ्यातून वाळूची चोरी झाली असती तर प्रशासनाच्या काहीच हाती आले नसते. त्यामुळे तातडीने हा लिलावाचा निर्णय घेण्यात आला आहे. ही लिलावाची प्रक्रिया २४ ते २७ सप्टेबर दरम्यान होणार आहे. ज्या वाळू पट्यांचा लिलाव होणार आहे त्यात पुढील गावांचा समावेश आहे.
परतूर तालुक्याती गोळेगाव, सावंगी गंगा, अंबड तालुक्यातील पाथरवाला बुद्रुक, गोंदी येथील गट क्रमांक १२, २११, ६ अशा तीन ठिकाणचे वाळू लिलाव होतील.

Web Title: 'Those' seized sand stocks will be auctioned

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.