तीन सावकारांच्या घरे, दुकानांवर धाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2019 12:43 AM2019-12-18T00:43:41+5:302019-12-18T00:44:13+5:30

अवैधरीत्या सावकारी करणाऱ्या तीन सावकारांच्या घरासह एका दुकानावर जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्या पाच पथकांनी धाडी मारल्या.

Three lenders raided houses, shops | तीन सावकारांच्या घरे, दुकानांवर धाडी

तीन सावकारांच्या घरे, दुकानांवर धाडी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : अवैधरीत्या सावकारी करणाऱ्या तीन सावकारांच्या घरासह एका दुकानावर जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्या पाच पथकांनी धाडी मारल्या. ही कारवाई मंगळवारी सकाळी अंबड तालुक्यातील सुखापुरी, रेवलगाव येथे करण्यात आल्या. या कारवाईत अनेक बॉण्ड, चेक, रजिस्ट्रीसह इतर लाखो रूपयांच्या व्यवहाराची कागदपत्रे हाती लागली आहेत.
अंबड तालुक्यातील रेवलगाव येथील एकाने तीन सावकारांविरुद्ध तक्रार दिली होती. या तक्रारीनंतर जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण यांनी पाच पथके तयार केली. त्यानुसार मंगळवारी सकाळी या पथकांनी रेवलगाव येथील सरुबाई विश्वनाथ भोंडवे यांच्या घरी, सुखापुरी येथील काकासाहेब तुळशीदास राखुंडे यांच्या घरी, दुकाने, सुखापुरी येथीलच रामदास चोखाजी पटेकर यांच्या घरी धाड टाकली. या कारवाईत अनेक बॉण्ड, चेक, रजिस्ट्रीसह इतर लाखो रूपयांच्या व्यवहाराची कागदपत्रे सापडली आहेत.
ताब्यात घेतलेल्या कागदपत्रांची तपासणी सुरू असल्याचे जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण यांनी सांगितले. कारवाईत सहभागी झालेल्या पथकात अंबडचे सहायक निबंधक परेश बेरा, जालन्याचे सहायक निबंधक परमेश्वर वरखडे, घनसावंगीचे सहायक निबंधक अजय भिल्लारे, परतूरचे सहायक निबंधक प्रणव वाघमारे, भोकरदनचे सहायक निबंधक श्रीराम सोनने यांचा सहभाग होता.
चार टीम : ३८ जणांचा सहभाग
अंबड तालुक्यातील रेवलगाव, सुखापुरी येथे पाच पथकांनी कारवाई केली. यात जिल्हा उपनिबंधक कार्यालयांतर्गत २० अधिकारी- कर्मचारी, १० पोलीस कर्मचारी व ८ पंच असे एकूण ३८ जणांचा या पथकात सहभाग होता.
लाखोंचा व्यवहार
जिल्हा उपनिबंधक कार्यालयाच्या वतीने करण्यात आलेल्या कारवाईत मोठ्या प्रमाणात कागदपत्रे सापडली आहेत. यात लाखो, कोट्यवधी रुपयांच्या व्यवहारांच्या नोंदी असल्याचे सांगण्यात येत आहे.

Web Title: Three lenders raided houses, shops

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.