जालना आगाराच्या ताफ्यात दाखल होणार तीन नवीन वातानुकूलित बसेस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2019 12:58 AM2019-11-18T00:58:59+5:302019-11-18T00:59:30+5:30
प्रवाशांचा दूरचा प्रवास सुलभ व्हावा, यासाठी जालना आगारात विना- वातानुकूलित आसनी व शयनयान अशी एकत्रित सेवा असलेल्या तीन बसेस दाखल होणार असल्याची माहिती आगारप्रमुख पंडित चव्हाण यांनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : प्रवाशांचा दूरचा प्रवास सुलभ व्हावा, यासाठी जालना आगारात विना- वातानुकूलित आसनी व शयनयान अशी एकत्रित सेवा असलेल्या तीन बसेस दाखल होणार असल्याची माहिती आगारप्रमुख पंडित चव्हाण यांनी दिली.
एम. जी. आॅटोमोटिव्ह ह्या बस कंपनीने या बसेची बांधणी केली आहे. जालना आगारातून काही बस सुरत व इंदौर येथे जातात. इंदौरसाठी ५७० रूपये व सुरतसाठी ६१५ रूपये दर एसटी. महामंडळाकडून प्रवाशांना आकारला जात आहे. दूरच्या प्रवासाला अनेकदा प्रवाशी खासगी बसला प्राधान्य देतात. यात महामंडाळाचे नुकसान होत आहे. हीच बाब हेरून एस.टी. महामंडाळातर्फे एस.टी.च्या बांधणीत बदल करण्यात आला आहे. प्रवाशांची आवड लक्षात घेवून विना- वातानुकूलित आसनी व शयनयान अशी एकत्रित सेवा प्रवाशांना देणाऱ्या बसची बांधणी करण्यात येत आहे. या तीन बसची जालना विभागीय कार्यालयातर्फे वरिष्ठांकडे मागणी करण्यात आली आहे. याला वरिष्ठांनी होकार दिला आहे. येत्या आठवड्याभरात या बस जालना आगारात दाखल होणार आहेत. या बसचे सीट आणि बर्थ यासाठी वेगवेगळे भाडे आकारणी केली जाणार आहे. या बसवरील चालकांना काही दिवस प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या बसमुळे बस आगाराच्या उत्पन्नात मोठ्या प्रमाणात वाढ होणार असल्याचा विश्वास महामंडाळाच्या अधिकाऱ्यांमधून व्यक्त केला जात आहे. या एका बसमध्ये ३० सीटर आणि स्लीपर १५ असे एकूण ४५ आसणे आहेत.