गोदापात्रात वाळू तस्करी करणारे तीन ट्रॅक्टर जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2019 12:52 AM2019-08-09T00:52:22+5:302019-08-09T00:53:12+5:30
गोदावरी नदीपात्रात अवैध वाळू तस्करी करणाऱ्यांवर शहागड पोलिसांनी गुरूवारी कारवाई केली. यावेळी तीन ट्रॅक्टर ताब्यात घेण्यात आले
लोकमत न्यूज नेटवर्क
शहागड : गोदावरी नदीपात्रात अवैध वाळूतस्करी करणाऱ्यांवर शहागड पोलिसांनी गुरूवारी कारवाई केली. यावेळी तीन ट्रॅक्टर ताब्यात घेण्यात आले असून, पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अंबड तालुक्यातील शहागड, वाळकेश्वर हद्दीत कोल्हापुरी बंधा-या पायथ्याशी अवैधवाळू उत्खनन सुरू असल्याची माहिती उपनिरीक्षक हनुमंत वारे यांना मिळाली होती. या माहितीवरून उपनिरीक्षक हनुमंत वारे, जमादार अख्तर शेख, पो.कॉ. योगेश दाभाडे यांनी गुरूवारी सकाळी गोदावरी नदीपात्र गाठले. पोलिसांचे पथक पाहताच तस्करांनी मिळेल तो मार्ग धरून पळ काढण्याचा प्रयत्न केला. पथकाने तीन ट्रॅक्टर पकडले. या प्रकरणी टॅक्टर चालक-मालक बाळू यादव, नितीन जोगदंड, गोविंद पवार, भागवत पवार व एक अज्ञात (रा. सर्व नागझरी. ता. गेवराई) या पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कारवाईवेळी पथकातील पोलिसांनी एकूण दहा लाखांचा मुद्देमाल ताब्यात घेतला.