थरारक ; दुचाकीवरील ग्रामसेविकेचा पाठलाग करून अज्ञाताने केले ब्लेडचे वार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2019 05:59 PM2019-05-13T17:59:08+5:302019-05-13T17:59:23+5:30
हल्लेखोरांनी ब्लेडचे सपासप वार करून लोणगांवकडे पलायन केले.
राजूर (जालना ) : भोकरदन तालुक्यातील ऊंबरखेडा ग्रामपंचातच्या ग्रामसेविका अनूराधा दत्तात्रय खांडेभराड (रा.लोणगाव ता.भोकरदन) ऊंबरखेडयाकडे दुचाकीवर जात असतांना पाठीमागून तोंडाला रूमाल बांधलेल्या दोन अज्ञात ईसमांनी दुचाकीवर पाठलाग करून त्यांच्या डाव्या हातावर ब्लेडने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना सोमवारी सकाळी ९ वाजेच्या सुमारास घडली. ग्रामसेवक महिलेवर भरदिवसा हल्ला झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
याविषयी पोलीसांनी दिलेली माहीती अशी की, ऊंबरखेडा येथील ग्रामसेविका अनूराधा दत्तात्रय खांडेभराड या आज सकाळी लोणगांवहून ऊंबरखेडला कर्तव्यावर जात असतांना ऊंबरखेडच्या अर्धा किलोमीटर पाठीमागे एका मोटारसायकलवर दोन अज्ञात ईसमांनी पाठीमागून त्यांचा पाठलाग केला. चालू गाडीवरच त्याच्याव अचानक डाव्या हातावर ब्लेडने हल्ला चढवला. अचानक हल्ल्यामुळे खांडेभराड गोंधळून जावून त्या गाडीवरुन खाली पडल्या. त्यानंतर अज्ञातांनी डाव्या हातावर ब्लेडचे सपासप वार करून गंभीर जखमी करून लोणगांवकडे पलायन केले. मारेकऱ्यांच्या तोंडाला रूमाल बांधलेला असल्याने ओळख पटू शकली नाही. सदर हल्ला कुणी व का केला हे समजू शकले नाही.
ग्रामसेवक महिलेवर भरदिवसा हल्ला झाल्याने परिसरात एकच खळबळ ऊडाली आहे. याबाबत राजूर पोलीसांना माहीती मिळताच स.पो.नि.सीताराम मेहेत्रे यांच्यासह प्रताप चव्हाण, संतोष वाढेकर, मनिषा शिंदे यांनी घटनास्थळी भेट दिली. याप्रकरणी अनूराधा खांडेभराड यांच्या तक्रारीवरून राजूर पोलीसांत अज्ञात आरोपी विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.