‘तोतलांनी तो भूखंड दर्गा परत करावा’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2019 12:07 AM2019-09-16T00:07:04+5:302019-09-16T00:08:12+5:30
तोतला याांच्याकडून अटी व शर्थीचे उल्लंघन करण्यात आल्याचा आरोप सय्यद जमील मौलाना यांनी करून त्यांच्या विरोधात औरंगाबाद येथील वक्फ बोर्डाच्या न्यायप्राधिकरणामध्ये आव्हान दिले होते. दोन्ही बाजुंचे म्हणणे ऐकून घेतल्यावर तोतला यांनी भाडेतत्ववारील जमिन दर्गा व्यवस्थापनाकडे परत करण्याचा निर्णय दिला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : येथील शेरसवार दर्गाची सर्व्हे क्रमांक १०२, १०३ मधील जमीन ही सत्यनारायण तोतलांना साधारणपणे १९७२ मध्ये पेट्रोलपंप चालविण्यासाठी भाडेतत्वावर दिली होती. परंतु मध्यंतरीच्या काळात सत्तनारायण तोतला याांच्याकडून अटी व शर्थीचे उल्लंघन करण्यात आल्याचा आरोप सय्यद जमील मौलाना यांनी करून त्यांच्या विरोधात औरंगाबाद येथील वक्फ बोर्डाच्या न्यायप्राधिकरणामध्ये आव्हान दिले होते. दोन्ही बाजुंचे म्हणणे ऐकून घेतल्यावर तोतला यांनी भाडेतत्ववारील जमिन दर्गा व्यवस्थापनाकडे परत करण्याचा निर्णय दिला आहे.
जालन्यातील अत्यंत मोक्याच्या ठिकाणी असलेली ही दर्गा शेरसवारची जमिन १९७२ मध्ये तोतला परिवाराने पेट्रोलपंप चालविण्यासाठी भाडेतत्वावर घेतली होती. मध्यंतरी या जमिनीचे भूभाडे देखील त्यांनी दिले नाही. तसेच ज्या उद्देशासाठी ही जमिन भाडे तत्वावर घेतली होती. त्या व्यतिरिक्त तेथे ढाबा चालविणे, हातपंप खोदून पाण्याची विक्री करणे तसेच वाहनांच्या पार्किंगसाठी भाड्याने देणे आदी आरोप सैय्यद जमील यांनी न्याय प्राधिकारणात तोतलांच्या विरूध्द दाखल दाव्यात केले आहेत. यावर औरंबादेतील न्याय प्राधिकरणमध्ये तीन न्यायाधींच्या बोर्डा समोर सुनावणी झाली. यावेळी दोन्ही बाजुंचा युक्तीवाद ऐकल्यावर प्राधिकरणने तोतला यांनी भाडे कराराचे उल्लंघन केल्याचा निर्णय दिला. तसेच ही जमिन दर्ग्याला परत देण्याचे निर्देशही तोतलांना दिले. या प्राधिकरणाच्या निर्णयामुळे मोठी खळबळ उडाली आहे.
दरम्यान सैय्यद जमील मौलाना हे शेर सवार दर्गाचे अधिकृत मुतवली नसल्याचा आरोपही तोतला यांनी यापूर्वी केला होता. त्यातच मध्यंतरी वक्फ बोर्डाने देखील मौलाना जमील हे मुतावली नसल्याचे मान्य करून त्यांच्या विरूध्द सदरबाजार पोलिस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल केला होता.
यावेळी मौलाना जमील यांना अधिकार नसतांना त्यांनी दर्गाची मोक्याची जमिन अनेकांना भाडेतत्वार करून दिल्याचे तक्रारीत म््हटले होते. यावरून त्यांना अटक होऊन कोठडीही मिळाली होती.
निर्णयाला आव्हान देणार
आम्ही कुठलेही कराराचे उल्लंघन केलेले नाही. चुकीच्या पध्दतीने आमच्यावर आरोप ठेवून आम्हाला बदनाम केले जात आहे. परंतु वास्तव परिस्थिती वेगळी आहे. यापूर्वी देखील वेगवेगळ्या न्यायिक प्रकरणात मौलाना सैय्यद जमील यांच्या विरोधात निकाल गेले आहेत. परंतु आता वक्फ बोर्डाच्या न्याय प्राधिकरणाने जो निकाल दिला आहे. त्याचा आपण आमच्या वकीलामार्फत अभ्यास करणार आहोत. त्या नंतर या प्राधिकरणाच्या निर्णयाला आम्ही न्यायालयात आव्हान देणार आहोत.दरम्यान ३ फ्रेब्रवारी २०१६ मध्ये वक्फ बोर्डाकडून आम्हांला माहिती अधिकारा खाली जमील मौलना यांची मुतवली म्हणून नेकणूक केली नसल्याचे त्यात म्हटले होते. - सत्यनारायण तोतला, पेट्रोलपंपाचे मालक.