लोकमत न्यूज नेटवर्कजालना : येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयात दुचाकी पासिंगसाठी गेले असता नागरिकांना दिवसभर कार्यालयात बसून ठेवले जात आहे. यात नागरिकांचा दिवसभराचा वेळ वाया जात आहे. तसेच परिवहन अधिकारी बाहेर गावावरून येणे- जाणे करतात. याचा सामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. यामुळे याकडे संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे, अशा मागणीचे निवेदन भ्रष्टाचार विरोधी लोकाधिकार संघटनेतर्फे जिल्हाधिका-यांना गुरूवारी देण्यात आले आहे.दुचाकी पासिंगची फिस भरल्यानंतर पासिंगसाठी एक ते दोन महिन्याची आॅनलाईन तारीख दिली जाते. खरे तर फीस भरल्यानंतर दोन ते चार दिवसांत गाडी पासिंग करण्यात यावी, तसेच पासिंगसाठी कार्यालयात गेल्यास दिवसभर नागरिकांना तेथे बसून राहावे लागते. तिथे पिण्याच्या पाण्याची सोय देखील नाही. यामुळे अनेकांची पाण्याअभावी हेळसांड होते. असेही निवेदनात म्हटले आहे.भ्रष्टाचार विरोधी लोकाधिकार संघटनेचे सय्यद अफसर सय्यद सिकंदर, जीवनराव केंढे, मतीन शेख, मुश्ताकभाई धोबी, बशीर खान, नासेरभाई सय्यद, सलीम शेख, वसिम शेख, रशीद शेख, दीपक चव्हाण आदींच्या निवेदनावर स्वाक्ष-या आहेत.
गाडी पासिंगसाठी नागरिकांना त्रास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 04, 2019 12:46 AM