नांदेड येथून जालन्यात तलवारी घेऊन आलेले दोघे जेरबंद
By दिपक ढोले | Published: March 9, 2023 05:32 PM2023-03-09T17:32:14+5:302023-03-09T17:33:04+5:30
रेल्वे स्थानक परिसरातून पोलिसांनी घेतले ताब्यात
जालना : नांदेड येथून सहा तलवारी घेऊन आलेल्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने बुधवारी रात्री रेल्वे स्थानक परिसरातून ताब्यात घेतले. अभिजितसिंग बादलसिंग टाक (रा. कन्हैयानगर, जालना) व सतनामसिंग शेरासिंग टाक (रा. नागेवाडी, जालना) अशी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत. त्यांच्याकडून सहा तलवारी जप्त करण्यात आल्या आहेत.
अभिजितसिंग टाक व सतनामसिंग टाक हे रेल्वे स्थानक परिसरात अवैध तलवारी घेऊन जात असल्याची माहिती एलसीबीचे पोलिस निरीक्षक सुभाष भुजंग यांना मिळाली, या माहितीवरून पोलिसांनी सदर ठिकाणी सापळा रचून दोघांना वेगवेगळ्या ठिकाणाहून ताब्यात घेतले. दोघांची झडती घेतली असता, अभिजितसिंग टाक याच्याजवळ भगव्या रंगाच्या कपड्यामध्ये पाच तलवारी मिळून आल्या. सतनामसिंग टाक याच्याकडे एक तलवार मिळून आली. दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध कदीम जालना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. अक्षय शिंदे, अपर पोलिस अधीक्षक राहुल खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. सुभाष भुजंग, पो.उप.नि. प्रमोद बोंडले, पो.हे.कॉ. सॅम्युअल कांबळे, फुलचंद हजारे, विनोद गडदे, कृष्णा तंगे, फुलचंद गव्हाणे, सागर बाविस्कर, दत्ता वाघुंडे, सचिन चौधरी, प्रशांत लोखंडे, पो.ना. सुधीर वाघमारे, देविदास भोजने, पो.कॉ. भागवत खरात, संजय सोनवणे, सचिन राऊत, योगेश सहाने, कैलास चेके, चालक पो.हे.कॉ. सूरज साठे यांनी केली आहे.