उंबरखेड्यात अज्ञाताकडून ग्रामसेविकेवर ब्लेडने वार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2019 01:08 AM2019-05-14T01:08:28+5:302019-05-14T01:11:26+5:30
उंबरखेडा ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविका उंबरखेड्याकडे दुचाकीवर जात असतांना पाठीमागून तोंडाला रूमाल बांधलेल्या दोन अज्ञात इसमांनी दुचाकीवर पाठलाग करून डाव्या हातावर ब्लेडने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना सोमवारी सकाळी घडली
लोकमत न्यूज नेटवर्क
राजूर : भोकरदन तालुक्यातील उंबरखेडा ग्रामपंचायतीच्या ग्रामसेविका उंबरखेड्याकडे दुचाकीवर जात असतांना पाठीमागून तोंडाला रूमाल बांधलेल्या दोन अज्ञात इसमांनी दुचाकीवर पाठलाग करून डाव्या हातावर ब्लेडने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. ग्रामसेवक महिलेवर भरदिवसा हल्ला झाल्याने परिसरात खळबळ ऊडाली आहे.
उंबरखेडा येथील ग्रामसेविका अनुराधा दत्तात्रय खांडेभराड (रा.लोणगाव, ता.भोकरदन) या आज सकाळी कार्यालयाकडे जात असताना
लोणगावहून उंबरखेडला कर्तव्यावर जात असतांना उंबरखेडच्या अर्धा किलोमीटर पाठीमागे मोटारसायकलवर दोन अज्ञात इसमांनी पाठीमागून त्यांना ओव्हरटेक करून अचानक डाव्या हातावर ब्लेडने हल्ला चढवला.
अचानक हल्ल्यामुळे खांडेभराड गोंधळून खाली पडल्या. त्यानंतर अज्ञातांनी डाव्या हातावर ब्लेडचे सपासप वार करून त्यांनी गंभीर जखमी करून लोणगावकडे पलायन केले. मारेकऱ्यांच्या तोंडाला रूमाल बांधलेला असल्याने ओळख पटू शकली नाही. सदर हल्ला कुणी व का केला, हे समजू शकले नाही. ग्रामसेवक महिलेवर भरदिवसा हल्ला झाल्याने परिसरात एकच खळबळ ऊडाली आहे. याबाबत राजूर पोलिसांना माहिती मिळताच स.पो.नि.सीताराम मेहेत्रे यांच्यासह प्रताप चव्हाण, संतोष वाढेकर, मनीषा शिंदे यांनी घटनास्थळी भेट दिली.