लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यात सोमवारी दुपारनंतर काही भागात वादळी वा-यामुळे भाजीपाला पिकांचे नुकसान झाले. तालुक्यातील वखारी येथे एका बैलाचा मृत्यू झाला. दरम्यान, राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी सायंकाळी वखारी येथे जाऊन नुकसानीची पाहणी केली.जिल्ह्यात दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असून, तुरळक ठिकाणी पाऊसही झाला आहे. सोमवारी सायंकाळी पाचनंतर ढग दाटून आल्यामुळे पावसाचे वातावरण तयार झाले होते. भोकरदन शहर व परिसरात काही वेळ थेंब थेंब पाऊस झाला. दरम्यान, सायंकाळी जालना तालुक्यातील वखारी परिसरात वादळी वारे सुटले. काही ठिकाणी झाडे उन्मळून पडली. केळींच्या बागासह टरबूज, खरबूज, टमाटे इ. भाजीपाला पिकाचे नुकसान झाले. रोहिदास काळे यांचा एक बैलाचा मृत्यू झाला. दरम्यान, राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी वखारी येथे जाऊन शेतक-यांशी चर्चा केली. सभापती पांडुरंग डोंगरे, पंडितराव भुतेकर यांची यावेळी उपस्थिती होती.
वादळी वाऱ्यामुुळे भाजीपाल्याचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2018 12:58 AM