लोकमत न्यूज नेटवर्कजालना : उन्हाच्या वाढत्या तीव्रतेमुळे पाणीपातळीत झपाट्याने घटत असून, शहरात जलवाहिनी नसलेल्या भागात पाणीसमस्या जाणवत आहे. त्यामुळे नागरिक बोअरवेल घेण्यास प्राधान्य देत आहे. मात्र, अडीचशे फुटांपर्यंत पाण्याऐवजी नुसताच फुपाटा निघत आहे.शहरात नगरपालिकेची जलवाहिनी नसलेल्या ढवळेश्वर, जांगडानगर, टीव्ही सेंटर, इंदेवाडी पाण्याची टाकी, सुंदरनगर, भवानीनगर, टेलिकॉम कॉलनी आदी भागातील नागरिकांना आजही कूपनलिकेच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागते. जलवाहिनी अंथरण्याचे काम सुरू असले तरी अद्याप बहुतांश भागात पाणीपुरवठा झालेला नाही. त्यातच वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे बोअरवेल, हातपंप कोरडे पडत आहेत. पाण्यासाठी नागरिक नवीन बोअरवेल घेण्यास प्राधान्य देत आहेत. मात्र, तीनश ते साडेतीनेश फुट बोअरवेल खोदूनही अनेक भागात पाणीच लागत नसल्याचे विवेकानंदनगर परिसरातील रहिवासी संतोष भारोटे यांनी सांगितले. कुंडलिका नदीवरील स्व. बाळासाहेब ठाकरे स्मृती बंधाऱ्यांमुळे कसबा, माळीपुरा, दु:खीनगर, संभाजीनगर, सकलेचानगर, गांधीचमन परिसरातील पाणीपातळीत काही प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे या भागात नवीन बोअरवेल घेण्यावर नागरिक भर देत आहेत.
पाण्याचा शोध थेट पाताळापर्यंत चालला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2018 1:07 AM