'आरक्षणाचा जीआर आल्यानंतरच उपचार'; मनोज जरांगे यांचा वैद्यकीय तपासणीस नकार

By विजय मुंडे  | Published: September 11, 2023 11:47 AM2023-09-11T11:47:29+5:302023-09-11T12:45:13+5:30

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गत १४ दिवसांपासून अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे यांचे बेमुदत उपोषण सुरू आहे.

' will take treatment only after arrival of Maratha Reservation GR'; Manoj Jarange's refusal to medical examination | 'आरक्षणाचा जीआर आल्यानंतरच उपचार'; मनोज जरांगे यांचा वैद्यकीय तपासणीस नकार

'आरक्षणाचा जीआर आल्यानंतरच उपचार'; मनोज जरांगे यांचा वैद्यकीय तपासणीस नकार

googlenewsNext

वडीगोद्री (जि.जालना) : अंतरवाली सराटी येथील उपोषणकर्ते मनोज जरांगे यांची प्रकृती खालावत आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी वैद्यकीय उपचारासाठी पथक आल्यानंतर जरांगे यांनी उपचार घेण्यास नकार दिला. मराठा आरक्षणाचा जीआर आल्यानंतरच तपासणी, उपचार घेणार असल्याची भूमिका जरांगे यांनी घेतली.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गत १४ दिवसांपासून अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे यांचे बेमुदत उपोषण सुरू आहे. शासनासमवेत चर्चेच्या तीने फेऱ्या अयशस्वी झाल्या असून, रविवारी सकाळपासून जरांगे यांनी पाणी पिणे, उपचार घेणे बंद केले आहे. रविवारी दुपारी व रात्री त्यांनी तपासणी करु दिली नाही. त्यामुळे त्यांची शुगर, बिपी तपासता आले नाहीत. डॉक्टरांनी रविवारीही दोन वेळेस विनवणी केली. मात्र जरांगे यांनी तपासणी व उपचार घेण्यास नकार दिला. वैद्यकीय पथक सोमवारी सकाळी वैद्यकीय पथक १०:४० वाजता उपोषणस्थळी आले होते. पथकातील डॉ. अतुल तांदळे यांनी बीपी, शुगर सह इतर तपासण्या करू द्या, अशी जवळपास अर्धा तास विनवनी केली. परंतु, जरांगे यांनी तपासणी, उपचारालाही नकार दिला.

Web Title: ' will take treatment only after arrival of Maratha Reservation GR'; Manoj Jarange's refusal to medical examination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.