२४ तासांच्या आत २ महिला चोर मुद्देमालासह ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2018 12:33 AM2018-11-26T00:33:38+5:302018-11-26T00:33:58+5:30
भोकरदन शहरातील सराफाच्या दुकानातून पंचायत समिती सदस्याच्या पर्सला ब्लेड मारून रोख ३० हजार रूपये लांबविणाऱ्या अनिता काळे आणि सुरेखा ज्ञानेश्वर पवार (दोघीही रा. वडीगोद्री ता़ अंबड) या दोन महिलांना भोकरदन पोलिसांनी २४ तासाच्या आत मुद्देमालासह अटक केली
लोकमत न्यूज नेटवर्क
भोकरदन : भोकरदन शहरातील सराफाच्या दुकानातून पंचायत समिती सदस्याच्या पर्सला ब्लेड मारून रोख ३० हजार रूपये लांबविणाऱ्या अनिता काळे आणि सुरेखा ज्ञानेश्वर पवार (दोघीही रा. वडीगोद्री ता़ अंबड) या दोन महिलांना भोकरदन पोलिसांनी २४ तासाच्या आत मुद्देमालासह अटक केली आहे़ सदर महिलाना अटक करण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज अत्यंत महत्वाचे ठरले आहे़
शनिवारी १२ वाजेच्या दरम्यान पंचायत समिती सदस्य कमलबाइर्् पगारे या मुलीसह शहरातील सर्वज्ञ ज्वेलर्समध्ये सोेने खरेदी साठी गेल्या होत्या. त्यावेळी त्याच्या पिशवीमध्ये ३० हजार रूपये असलेली पर्स ठेवली व समोर सराफ व्यापा-याकडून सोन बघत असतानां महिलांनी ब्लेड मारून पर्स लंपास केली होती. त्यानंतर ऋुषी पगारे यांच्या तक्रारी वरून भोकरदन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर चोरी उघडकीस आण्यासाठी पोलीस अधीक्षक एस़चैतन्य, अप्पर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील जायभाये, पोलीस निरिक्षक दशरथ चौधरी, पोलिस उपनिरीक्षक अमन सिरसाठ, पोलिस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर साखळे, पोलीस कर्मचारी रामेश्वर शिनकर, सागर देवकर, गणेश पायघन, गणेश निकम, सुलाबाई मारकड, संगीता मोकासे, सूर्यवंशी, यांनी प्रयत्न केले. तपास डी़जे़ शिंदे हे करीत आहे़
या चोरी नंतर पोेलिसानी सराफा दुकानातील सीसीटीव्ही फूटेज घेऊन ते जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांच्या अधिकाºयांना व्हॉट्सअॅपवर पाठविले होते. त्या अधारे सदर महिला या वडीगोद्री येथील असल्याची माहिती पोलिसाना मिळाली. उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील जायभाये व पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांनी गोदी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अनिल परजणे व पोलीस उपनिरीक्षक हनुमंत वारे, यांना सदर महिला या वडीगोद्री येथील असल्याचे सांगितले. त्यांनी लगेच शनिवारी सायंकाळी या महिलांना ताब्यात घेतले. सुरूवातीला या महिलान्ांी उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र त्यांना फूटेज दाखवून पोलिसी खाक्या दाखविताच त्यांनी चोरी केलेले ३० हजार रूपये भोकरदन पोलिसांच्या स्वाधीन केले़