अस्वलाच्या हल्ल्याने तरुण शेतकरी अत्यवस्थ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2018 12:40 AM2018-06-04T00:40:47+5:302018-06-04T00:40:47+5:30
भोकरदन तालुक्यातील धावडा येथे अस्वलाने हल्ला केल्याने शेतकरी गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. संतोष तुकाराम लेनेकर (३३) असे जखमी शेतकऱ्याचे नाव आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
धावडा : भोकरदन तालुक्यातील धावडा येथे अस्वलाने हल्ला केल्याने शेतकरी गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. संतोष तुकाराम लेनेकर (३३) असे जखमी शेतकऱ्याचे नाव आहे. या प्रकारानंतर परिसरातील शेतक-यांमध्ये भीतीचे वातावरण असून, वनविभागाकडून आवश्यक खबरदारी घेतली जात आहे.
धावडा येथील तुकाराम लेनेकर हे शनिवारी सकाळी दोन मुलांसह मेहगाव परिसरातील शेतातून काही अंतरावर असलेल्या झºयावर पाणी आणण्यासाठी जात असताना, अचानक दोन अस्वल झुडपांमधून समोर आली. त्यातील एकाला लेनकर यांनी हुसकावले. मात्र, दुस-या अस्वलाने संतोष लेनकर (३३) याच्या पोटाला, हाताला व पायाला चावा घेऊन जखमी केले.
तुकाराम लेनकर व दुस-या मुलाने आरडाओरड करत अस्वलास कसेबसे हुसकावले. त्यानंतर जखमी गजाननला बैलगाडीतून बुलडाणा येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले. पिण्याच्या पाण्याचा शोधात अस्वल व अन्य प्राणी धावडा, मेहगाव, वाढोणा, वडाळी, वडोदतांगडा या भागात येत असल्याचे शेतक-यांनी सांगितले.