झिरो बजेट शेतीसाठी दुग्धव्यवसाय आवश्यक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2019 12:43 AM2019-01-04T00:43:12+5:302019-01-04T00:44:04+5:30

झिरो बजेट शेतीचा व्यवसाय करण्यासाठी त्याला जोड म्हणून दुग्धव्यवसाय करणे अत्यंत आवश्यक आहे, असे मत अर्जुन खोतकर यांनी व्यक्त केले.

Zero budget requires dairying for agriculture | झिरो बजेट शेतीसाठी दुग्धव्यवसाय आवश्यक

झिरो बजेट शेतीसाठी दुग्धव्यवसाय आवश्यक

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
भोकरदन : झिरो बजेट शेतीचा व्यवसाय करण्यासाठी त्याला जोड म्हणून दुग्धव्यवसाय करणे अत्यंत आवश्यक आहे, असे मत पशुसंर्वधन व दुग्ध विकास राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी गुरुवारी भोकरदन येथील गोशाळेला भेट दिल्यानंतर व्यक्त केले.
राज्यात भेसळयुक्त दूध विक्री मोठ्या प्रमणात होत असून, मुंबईसह शहरी भागात येणारे दुधाचे टँकर तपासण्याचा अधिकार आमच्या खात्याला देण्याबाबत आपण मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे. लवकरच तो अधिकार आमच्या विभागाला मिळणार आहे. असे असले तरी आपल्या महाराष्ट्रात शेती हा मुख्य व्यवसाय आहे. मात्र दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी आपण झिरो बजेट शेती करण्याची नितांत गरज आहे. त्यासाठी गायी संभाळाव्या व त्यापासून निघणारे गोमूत्र व शेण यांच्या माध्यमातून शेतीतून चांगले उत्पादन निघते. शिवाय दर्जेदार दूधसुध्दा मिळते, असे सांगून शेतकऱ्यांनी शेतीला पूरक व्यवसाय म्हणून दुधाचा जोडधंदा करावा, असे सांगितले. यावेळी पंडित भुतेकर, रमेश गव्हाड, मनिष श्रीवास्तव, नवनाथ दौड, कैलास पुंगळे, माधवराव हिवाळे, सुरेश तळेकर, महेश पुरोहित, रामेश्वर जंजाळ, दिलीप ओस्तवाल, भूषण शर्मा आदी उपस्थित होते़ यावेळी गोशाळेच्या वतीने दिलीप ओस्तवाल व नितीन ओस्तवाल यांनी खोतकर यांचे स्वागत केले़
भोकरदन-सिल्लोड रोडवरील गौशाळेला राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी भेट दिली. यावेळी जयगुरू गणेश जय गुरूमिस्त्री गोरक्षण चारिटेबल ट्रस्टच्या वतीने २०० ते ३०० जनावरांची ही अत्यंत आधुनिक गोशाळा सुरू केल्याबद्दल संस्थाध्यक्ष नितीन ओस्तवाल व दिलीप ओस्तवाल यांचा गौरव केला. या गौशाळेला आपण राज्यशासन व पक्षाच्या वतीने मोफत चारा पुरवठा करू, असे सांगून या ठिकाणी जनावरांसाठी वैद्यकीय सेवा तात्काळ देण्याबाबत त्यांनी संबंधित पशुवैद्यकीय अधिकाºयांना आदेश दिले. शिवाय दुष्काळी परिस्थितीत या ठिकाणी पाणी व चारा देण्यात येईल, असे सांगितले.

Web Title: Zero budget requires dairying for agriculture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.