झेडपीचे २४ कोटी रुपये अखर्चित ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2018 12:59 AM2018-09-03T00:59:30+5:302018-09-03T01:00:20+5:30
सन २०१७-१८ वर्षांत जिल्हा परिषदेचा २४ कोटी रुपये निधी हा अखर्चित राहिला आहे.
दीपक ढोले ।
लोकमत न्यूज नेटवर्क
जालना : ग्रामीण भागातील विकासासाठी प्रत्येक वर्षी जिल्हा परिषदेच्या सर्वाच विभागांना कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध दिला जातो. परंतु, जालना जिल्हा परिषदेच्या अनेक विभाग हा निधी खर्च करीत नसल्यासमोर आले आहे. सन २०१७-१८ वर्षांत जिल्हा परिषदेचा २४ कोटी रुपये निधी हा अखर्चित राहिला आहे. परंतु, कासवगतीमुळे हा निधी दोन-दोन वर्ष खर्च होत नसल्याचा प्रकार समोर आला आहे.
राज्य शासनातर्फे ग्रामीण भागांचा विकास करण्यासाठी जिल्हा परिषदेला लाखों रुपयांचा निधी दिला जातो.
या निधीतून जिल्हातील ग्रामीण भागाचा विकास करणे, गावात विविध योजना राबविणे, कृषी क्षेत्राचा विकास करणे, शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविणे, नागरिकांना घरकुल देणे इ. कामे केली जातात. परंतु, जालना जिल्हा परिषदेचे अधिकारी हा निधी खर्च करीत नसल्याचे समोर आहे. सन २०१७-१८ मध्ये जि. प. च्या पाणी पुरवठा विभाग, समाज कल्याण विभाग, बांधकाम विभाग, पशुसंवर्धन विभाग, महिला बाल कल्याण ंिवभाग, शिक्षण विभाग, आरोग्य विभाग, पंचायत समिती विभाग, सिंचन विभाग यासर्व विभागांचा जवळपास २४ कोटी रुपयांचा निधी अखर्चित राहिला आहे. यामुळे ग्रामीण भागातील कामे खोळंबली आहेत.
ग्रामीण भागातील कामासाठी प्रत्येक वर्षी कोट्यवधीचा निधी उपलब्ध करुन दिला जातो. परंतु, मागील वर्षींचा सर्वच विभागांनी अपेक्षित गतीने कामे केली नाही. त्यामुळे शासनाकडून येणारा निधी खर्च करण्यात संबंधित यंत्रणा अक्षरश: अपयशी ठरताना दिसत आहे.
सर्व विभागांना निधी उपलब्ध असतानाही कामे अपेक्षित गतीने पूर्ण होत नसल्याने तीव्र प्रतिक्रिया उमटु लागल्या आहे.
जि.प.: सभेतही अखर्चित निधीवरून चर्चा
जिल्हा परिषदेच्या सर्व साधारण सभेतही अखर्चित निधीवरुन सदस्यांनी अधिकाºयांना धारेवर धारले होते. तसेच वारंवार सदस्य हे अखर्चित निधीवरुन चर्चा करतात. परंतु, त्यांचा काहीच परिणाम होताना दिसत नाही.