मध्यरात्रीचा थरार, कासोदा येथे आगीमध्ये लग्नाच्या साहित्यासह १० घरे जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 01:39 PM2018-03-19T13:39:15+5:302018-03-19T13:39:15+5:30

संसाराची राख रांगोळी

10 houses burnt with fireworks in a fire in Tharar, Kasoda, at midnight | मध्यरात्रीचा थरार, कासोदा येथे आगीमध्ये लग्नाच्या साहित्यासह १० घरे जळून खाक

मध्यरात्रीचा थरार, कासोदा येथे आगीमध्ये लग्नाच्या साहित्यासह १० घरे जळून खाक

googlenewsNext
ठळक मुद्देकुटुंब उघड्यावरआजूबाजूचे नागरिक धावले मदतीला

आॅनलाइन लोकमत
कासोदा, जि. जळगाव, दि. १९ - एरंडोल तालुक्यातील कासोदा येथील कासोदा जीन झोपडपट्टी भागात रविवारी मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास अचानक आग लागून एका घरातील लग्नाच्या साहित्यासह दहा घरे जळून खाक झाली. यामध्ये सर्व कुुटुंबाच्या संसाराची राखरांगोळी होऊन हे दहाही कुटुंब उघड्यावर आले आहेत.
कासोदा येथे जीन झोपडपट्टी हा भाग गेल्या अनेक वर्षापासून वसलेला असून या भागात कच्ची घरे आहेत. येथील सर्व रहिवासी रविवारी रात्री नेहमीप्रमाणे झोपलेले असताना या भागात मध्यरात्री अडीच वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. या वेळी गोंधळ उडून सर्वजण धावत सुटले. पाहता पाहता १० घरे आगीच्या भक्षस्थानी पडले.
आग लागल्यानंतर आजूबाजूच्या लोकांनी मदतीसाठी धाव घेतली. मात्र आग एवढी मोठी होती की, यामध्ये घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले. येथील रहिवाशांच्या अंगावरीलच कपडे केवळ शिल्लक राहिले आहे.
एका महिलेने आपल्या मुलाच्या लग्नासाठी धान्य व इतर साहित्य घेतलेले होते. तेदेखील जळून खाक झाले. या आगीमुळे सर्व कुटुंबीय उघड्यावर आले असून पंचनाम्याचे काम सुरू होते.

Web Title: 10 houses burnt with fireworks in a fire in Tharar, Kasoda, at midnight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.