दुचाकीवरुन पडल्या १२ वर्षाच्या मुलाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:17 AM2021-03-05T04:17:02+5:302021-03-05T04:17:02+5:30
जळगाव : चालत्या दुचाकीवरुन पडल्याने डोक्याला मार लागून अयान सुलतान पटेल (वय १२) या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना ...
जळगाव : चालत्या दुचाकीवरुन पडल्याने डोक्याला मार लागून अयान सुलतान पटेल (वय १२) या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी दुपारी साडे बारा वाजता सुप्रीम कॉलनी परिसरात घडली. दुचाकीची धडक बसल्याने मृत्यू झाल्याची नोंद पोलीस ठाण्यात झाली आहे. याप्रकरणी दुचाकीचालकाविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे.
यासंदर्भात नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, अयान सुलतान पटेल हा गुरुवारी दुपारी १२.३० वाजता अंगणात गल्लीतील मित्रासोबत खेळत होता. दोघं जण दुसर्याची गाडी घेऊन सहज फिरायला गेले असता मागे बसलेला अय्यान खड्डयामुळे दुचाकीवरुन खाली पडला व त्यात डोक्याला गंभीर दुखापत होऊन त्याची जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तातडीने त्यांना जिल्हा वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले व वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी केली असता मयत घोषित केले. अयान पटेल यांचे वडील सुलतान फकीरा पटेल हे हमालीचे काम करतात तर आई रेश्मा पटेल या गृहिणी आहेत. मोठा भाऊ तौहिद हा शिक्षण घेत आहे. अपघातात अयानचा मृत्यू झाल्यामुळे हळहळ व्यक्त होत आहे.