कर्ज देण्याच्या नावाखाली नावाखाली १६ लाखांचा गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 04:14 AM2021-04-12T04:14:14+5:302021-04-12T04:14:14+5:30

फोटो जळगाव : कमी व्याजदरात कर्ज मिळवून देण्याच्या नावाखाली जिल्ह्यातील नागरिकांना १६ लाख रूपात गंडा घालणाऱ्या आशिष अशोकराव ...

16 lakh under the guise of lending | कर्ज देण्याच्या नावाखाली नावाखाली १६ लाखांचा गंडा

कर्ज देण्याच्या नावाखाली नावाखाली १६ लाखांचा गंडा

Next

फोटो

जळगाव : कमी व्याजदरात कर्ज मिळवून देण्याच्या नावाखाली जिल्ह्यातील नागरिकांना १६ लाख रूपात गंडा घालणाऱ्या आशिष अशोकराव जमेकर (वय ३८,रा. वर्धा) व पंकज सर्जेराव पाटील (वय ३२, रा. वावडे ता. अमळनेर) या दोघांना रामानंद पोलिसांनी रविवारी अटक केली आहे.

गरीब व आर्थिक दुर्बल नागरिकांना कमी व्याज दरात कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी एका खासगी कंपनीने जळगाव जिल्ह्यात सात जिल्हा प्रतिनिधींची नियुक्ती केली होती. अनेकांना कर्ज मिळवून देण्याच्या नावाखाली प्रोसेसिंग फी म्हणून प्रत्येकाकडून २ हजार रूपये म्हणून जिल्हा प्रतिनिधींनी घेण्यास सुरूवात केली. जिल्ह्यात शेकडो नागरिकांकडून सुमारे १६ लाख रूपये वसूल करून सर्व जण फरार झाले होते. याप्रकरणी खंडू महाले (रा. खंडेराव नगर )यांच्या फिर्यादीवरून रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस कर्मचारी नरेंद्र वारूळे यांनी केलेल्या तांत्रिक मदतीच्या आधारे एक संशयित हा वर्धा तर दुसरा अमळनेर तालुक्यात असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार रामानंद नगर पोलीस ठाण्याचे हवालदार संजय सपकाळे, इकबाल पिंजारी, अनमोल पटेल हे वर्धा येथे रवाना झाले होते. त्यांनी आधी आशिष अशोकराव जमेकर याला अटक केली तर दुसरा पंकज सर्जेराव पाटील याला वावडे ता. अमळनेर याला राहत्या घरातून अटक केली आहे. दोघांना जळगाव जिल्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

Web Title: 16 lakh under the guise of lending

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.